
पाचोरा :- रोटरी क्लब पाचोरा यांचे तर्फे विद्यार्थ्यांना गर्भाशय कॅन्सर जनजागृती
आणि HPV लसीकरण यावर मार्गदर्शन
पाचोरा :- रोटरी क्लब पाचोरा तर्फे विद्यार्थ्यांना गर्भाशय कॅन्सर जनजागृती
आणि HPV लसीकरण यावर मार्गदर्शन
पाचोरा :- रोटरी क्लब पाचोरा - भडगाव आणि सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया प्राव्हेट लिमीटेड यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता पाचवी ते दहावी चे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यासाठी गर्भाशय कॅन्सर,लसीकरण आणि मार्गदर्शन पर कार्यक्रम आज दिनांक 25 जून 2024 शिंदे इंटरनॅशनल स्कुल पाचोरा येथे संपन्न झाला.
यावेळी रोटरी क्लबचे सचिव डॉ मुकेश तेली यांनी प्रास्ताविक केले आणि डॉ विजय जाधव, डॉ राहुल काटकर आणि डॉ प्रशांत सांगडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख उपस्थिती प्रा.डॉ पंकज शिंदे अध्यक्ष,डॉ मुकेश तेली सचिव रोटरी क्लब पाचोरा-भडगाव तसेच डॉ राहुल काटकर,डॉ कुणाल पाटील, डॉ अमोल जाधव, डॉ अजय परदेशी, डॉ तौसिफ़ खाटीक,चंद्रकांत लोढाया, भरत सिनकर यासोबत शाळेचे अध्यक्ष पंडित तात्या शिंदे , शाळेचे मुख्यध्यापक डॉ विजय पाटील सर यासामवेत सर्व शिक्षक शिक्षिका आणि कर्मचारी उपस्तित होते. या कार्यक्रम साठी सिरम इस्टिटयूट चे हितेश पांडे यांचे सहकार्य लाभले.