logo

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची संघटना हायकोर्टात जाणार. प्रलंबित मागण्या कधी मंजूर होणार?

महाराष्ट्र राज्य कृतिशील निवृत्त अधिकारी कर्मचारी संघटनेची तिसरी वार्षिक सर्वसाधारण सभा पुणे येथे दिनांक 23/6/3024 रोजी संपन्न झाली. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत दळवी रिटायर्ड आयएएस व माजी विभागीय आयुक्त पुणे यांनी या सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने राज्यभरातून उपस्थित राहिलेले संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य यांना संबोधित करताना संघटना सदस्यांची वाढलेली संख्या व संघटनेने वर्षभरामध्ये कामाचे कौतुक केले.
सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने राज्यातील संघटनेच्या जिल्हास्तरावरील शाखांमध्ये विविध उपक्रम राबविणारे संघटनेचे अध्यक्ष,प्रवर्तक,सचिव व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संघटनेच्या वर्षभर केलेल्या कामाचा प्रतिबिंब म्हणून विशेष स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या सभेस राज्यातील एकूण 20 जिल्ह्यातून संघटनेचे 200 पदाधिकारी आणि सभासदांनी पुणे येथे उपस्थिती दर्शवून भरघोस प्रतिसाद दिला. या सभेस इंजिनीयर अरुण कांबळे सेवानिवृत्त कार्यकारी संचालक जलसंपदा विभाग हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले होते. तसेच इंजिनियर व्यंकटराव गायकवाड से. नि. सचिव जलसंपदा विभाग, श्री रवींद्र धोंगडे सेवानिवृत्त संचालक लेखा व कोषागारे विभाग आणि डॉ नलावडे सातारा यांनी मार्गदर्शन केले.
एक जानेवारी 2016 पूर्वी निवृत्त झालेल्या पेन्शनर कुटुंब निवृत्तीवेतनधारकांचे नोशनल पे फिक्सेशन पद्धतीने सातव्या वेतन आयोगाचे बेसिक पेन्शन रिविजन आणि 80 वर्ष व त्यावरील अतिवृद्ध निवृत्तीवेतनधारकांसाठी अतिरिक्त वेतन मिळणे कामी तसेच निवृत्तीवेतन व अंश राशीकरण पूणर्स्थापना याबाबत शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने माननीय उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्याचे या सभेच्या निमित्ताने ठरविण्यात आले.
सभेचे नेटके आयोजन, उत्तम व्यवस्था, व मान्यवर वक्त्यांनी केलेले बहुमोल असे मार्गदर्शन यामुळे ही सर्वसाधारण सभा फलदायी झाली.असे समाधानाचे उद्गार राज्यभरातून उपस्थित राहिलेल्या सभासदांनी व्यक्त केले.
या सर्वसाधारण सभेचे प्रास्ताविक आणि मागील वर्षाचा आढावा संघटनेचे कार्याध्यक्ष मनोहर पोकळे यांनी केले. उपस्थित सर्व पदाधिकारी सभासद आणि ही सर्वसाधारण सभा यशस्वी करणाऱ्या सर्वांचे आभार संघटनेचे सरचिटणीस श्री टी के गुरव यांनी मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुनील कुऱ्हाडे यांनी केले.

192
19034 views