
गिरणी कामगारांच्या मुंबईतील अस्तित्वासाठी महामेळाव्याचे आयोजन करण्याचे शिष्टमंडळाला मा. मनोज दादा जरांगे पाटील यांचे आदेश
सोमवार दिनांक २४ जुन २०२४ रोजी छत्रपती संभाजी नगर येथे गिरणी कामगार व वारस यांच्या शिष्टमंडळाने संघर्ष योद्धा मा.श्री जरांगे पाटिल यांची भेट घेऊन गिरणी कामगारांच्या विविध प्रश्नावर सविस्तर चर्चा केली प्रामुख्याने गेले ४२ वर्षात भ्रष्ट राजकीय व्यवस्थेने जाणीवपूर्वक मराठी माणसांचे मुंबईतील कमी केलेले अस्तित्व पुन्हा नव्याने निर्माण करण्यासाठी गिरणी कामगार व वारसांचे मोफत पुनर्वसन मुंबई मध्येच करणे किती आवश्यक आहे याची सविस्तर माहिती मा.श्री. मनोज दादा जरांगे पाटील यांना संयुक्त मराठी चळवळीच्या शिष्टमंडळाने दिली असता विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन दादांनी संयुक्त मराठी लढ्याला सक्रिय समर्थन देण्याचे आश्वासित केले. त्याचबरोबर येणाऱ्या काळात लवकरच मुंबईमध्ये गिरणी कामगारांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्याचे आदेश शिष्टमंडळाला दिले.
१५ मार्च २०२४ रोजी एक शासन निर्णय घेऊन सरकारने गिरणी कामगारांचे मुंबईतील अस्तित्व नाकारणे म्हणजे संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा एक प्रकारे अपमानच करण्यासारखे आहे. मुंबईतील गिरणी कामगारांच्या हक्काच्या जमिनी गिरणी मालकांना भ्रष्ट मराठी राजकारणी मंडळींनी वेळोवेळी कायद्यात बदल करून शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य मराठी गिरणी कामगारांचे अस्तित्व मुंबईतून संपवण्यासाठी कशाप्रकारे षडयंत्र रचलेे गेले याची सविस्तर माहिती शिष्टमंडळाचे प्रतिनिधी श्री हेमंत गोसावी, श्री रमाकांत बने, श्री हनुमंत निकम, श्री ज्ञानेश्वर मोरे यांनी मा.श्री.मनोज दादा जरांगे पाटील यांना दिली असता मा .जरांगे पाटील यांनी शिष्टमंडळाला आदेश दिले तुम्ही एक दिवस सर्व गिरणी कामगार व वारस संघटित करा .आपण आपल्या जमिनीचा शोध मुंबई येऊन घेऊ मी माझ्या मराठी माणसांच्या पाठीमागे १००% ताकदीने उभा आहे. त्याच बरोबर आता सरकारकडे जाण्याची गरज, माझ्या मराठी गिरणी कामगारांना पडणार नाही, सरकारच आपल्याकडे येईल तुम्ही एक दिवस ठरवा सर्व गिरणी कामगार व वारस यांना संघटित करा मी तुमच्या साठी दुप्पट ताकदीने मुंबईमध्ये हजर राहिन तुम्ही नियोजन करा मी गिरणी कामगारांच्या न्यायहक्का साठी मुंबईत येतोय अशी प्रतिक्रिया मा.मनोज जरांगे पाटील यांनी दिली.