logo

शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री नाशिकला

नाशिक (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकसभा निवडणुकीनंतर आता पुन्हा एकदा विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारार्थ निवडणूक रिंगणात उतरले आहेत. ना. शिंदे शनिवारी (दि. २२) नाशिक दौºयावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांच्या पदाधिका-यांची बैठक होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या या दौ-याचा दराडे यांना कितपत फायदा होईल, याकडे लक्ष लागले आहे.
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये महायुतीतील घटक पक्षांमध्येच फूट पडली आहे. नाशिकच्या जागेसाठी शिवसेना शिंदे गटातर्फे किशोर दराडे उमेदवार असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाने अ‍ॅड. महेंद्र भावसार यांना उमेदवारी दिल्यामुळे दोन्ही उमेदवारांना ठाकरे गटाच्या संदीप गुळवेंचे आव्हान असेल. अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे देखील नगरमधून रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात चुरस वाढली आहे.

बातमी सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा👉
https://maharahstranews.com/?p=387

5
223 views