Bhusawal News
२१ जून २०२४ । जामनेर पोलीस ठाण्यावर गुरुवारी रात्री जमावाकडून तुफान दगडफेक करण्यात आली असून यात काही पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे. दरम्यान या घटनेची दखल मंत्री गिरीश महाजन यांनी घेतली असून त्यांनी या घटनेवर ट्विटही केलं आहे. त्यांनी माध्यमांना या घटनेविषयी माहिती दिली. जनतेचा आक्रोश आणि संताप रास्त आहे. पण कोणीही कायदा हातात घेऊ नये असं महाजन म्हणाले.नेमकं काय म्हणाले गिरीश महाजन?जामनेर तालुक्यातील एका गावात सहा वर्षीय मुलीवर अत्याचार करत तिची हत्या करण्यात आली होती. तियाच्यावर अतिशय दुर्दैवीप्रकारे अत्याचार केला. हे कुणी केलं होतं हे सर्व डिटेक्ट झालंय. लोकांनी त्या आरोपीला आम्ही शिक्षा देतो म्हणत आमच्याकडे सोपवा, अशी मागणी केली. मात्र पोलिसांना तसं करता येत नाही”, असं गिरीश महाजन म्हणाले.