logo

केंद्रीयमंत्री ना.प्रतापराव जाधव यांनी नागरी सत्काराचा कार्यक्रम बाजुला ठेवून चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या गावाची केली पाहणी.देऊळगाव घुबे येथील मृतक सईच्या कुटुंबाना दिला ४ लाखांचा धनादेश.

बुलडाणा (प्रतिनिधी ) 12 जूनच्या सायंकाळी चिखली तालुक्यातील काही गावांमध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला होता .वादळी पावसामुळे गावकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात झाले होते केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर त्यांनी नागरी सत्कार बाजूला ठेवून नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आणि मृतक सई च्या घरी सांत्वनपर भेट दिली तिच्या परिवाराला आधार देत शासनातर्फे चार लाख रुपयांच्या सानुग्रह अनुदानाचा धनादेशही दिला.
तीन दिवसांआधी 12 जुनच्या सायंकाळी चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे येथे वादळाने थैमान घातले होते.या वादळी पावसामुळे परिसरामध्ये नागरिकांच्या घरावरची टिनपत्रेही उडून गेली शेतमालाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते यामध्येच सई साखरे नावाची 6 महिन्यांची चिमुकली छताला बांधालेल्या झोक्यासह उडून गेली होती, त्या दुर्घटनेत तिचा जागीच मृत्यू झाला होता. दरम्यान आज 15 जुनला केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव बुलढाणा जिल्ह्यात आल्यानंतर त्यांनी सत्काराचे कार्यक्रम बाजूला ठेवून आधी देऊळगाव घुबे गाठले. वादळाने नुकसान झालेल्या ग्रामस्थांना धीर दिला. मृतक सई साखरेच्या कुटुंबियांच्या घरी जाऊन तिच्या आई-वडिलांचे सांत्वन केले साखरे परिवाराला धीरदेत ४ लाख रुपयांच्या शासकीय मदतीचा धनादेश दिला यावेळी देऊळगाव घुबे गावात वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली नारायण करवंडे यांच्याही घरी भेट देऊन पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली त्यानंतर चिखली तालुक्यातील मेरा बुद्रुक येथील शेतकरी रामेश्वर पडघान आणि त्यांचा मुलगा वैभव यांचा विजेचा करंट लागल्याने मृत्यू झाला होता या कुटुंबीयांच्या घरी केंद्रीय मंत्र्यांनी सांत्वनपर भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं .केंद्र आणि राज्य सरकार आपल्यासोबत आहे. नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळेल असा शब्द यावेळी केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिला. साबेतच अधिकाऱ्यांनाही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी तात्काळ कारवाई करण्याचे निर्देशित केले यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार शशिकांत खेडेकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि महसूल प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.

63
10498 views