कुणबी मराठा हलका मराठा असं आहे का?
महाराष्ट्रातील मराठा आरक्षणावर पुन्हा उपोषणाला सुरुवात.मराठा समाजाला मीच आरक्षण मिळवून देणार असा निर्धार केलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आठ जून पासून आंतरवाली सराटी गावात उपोषणाला सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षणाला विरोध दर्शविला असलेल्या पक्ष्यांच्या उमेदवाराला पाडा असा आदेश मराठा बांधवांना दिला होता. या आदेशामुळे मराठवाड्यातील भाजपाच्या उमेदवारांना जबरदस्त फटका बसला. करोडोच्या संख्येने असलेल्या बहुसंख्य मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी गेल्या सत्तर ऐंशी वर्षांच्या कालावधीत कुणीही प्रयत्न केला नाही,किंवा हा समाज परंपरेने सत्तेत राहिल्यामुळे दाते,जाणते राजे म्हणून वापरल्यामुळे या समाजाला आरक्षणाची गरज वाटली नाही ,ही खरी वस्तुस्थिती आहे. सत्तेमध्ये ऐंशी टक्के वाटा असलेल्या मराठा समाजाला,नेत्यांना आरक्षण मागणे ही फालतुगिरी वाटून राहिली होती. दुर्बल, गरजवंत मराठे,सत्तेतील मराठ्यांच्या चुकांमुळे आम्ही भरडले जात आहोंत ही बाब निदर्शनास आणून देत आहेत. यात गंमत अशी आहे की आजही उच्च विद्याविभूषित मराठा किंवा सरंजामी मराठा किंवा शेंकडों वर्षांपासून पाटीलकी,देशमुखी भोगलेल्या मराठा समाजाला backward class मध्ये किंवा मराठ्यांतील "हलका मराठा समाज "जो कुणबी मराठा म्हणून मीरवायला तयार होत नाहीये.