logo

खर्डा- शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू बी बियाणे घेण्यासाठी केली गर्दी

खर्डा- शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू बी बियाणे घेण्यासाठी केली गर्दी

जामखेड तालुक्यातील खर्डा शहर सर्वात मोठी बाजारपेठ असलेले गाव, खर्डा शहराला जोडून असलेले परिसरातील 12 खेडेगावाच्या शेतकऱ्यांनी खर्डा येथे बी बियाणे घेऊन जातात, दोन दिवस पाऊस झाल्याने शेतकरी वर्ग आनंदीत आहे काही ठिकाणी पेरण्या चालू झालेले आहेत शेतकऱ्यांनी शेतातील तण काढून शेतीची उत्तम प्रकारे मशागत केलेली आहे ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी शेणखत टाकून जमीन योग्य प्रकारे कसून घेतलेली आहे जमिनीची मशागत बैल जोडीने केली जात होती. त्यामुळे शिवारामघ्ये या महिन्यांमध्ये बैलाच्या गळ्यातील गोघर -घाटीचा मंजुळ आवाज ऐकावयास मिळत होता. परंतु, बदलत्या काळानुसार व विज्ञान युगामध्ये शेतीची मशागत ट्रॅक्टरच्या साह्याने केली जाऊ लागली आहे. जरी विज्ञान युगामध्ये अत्याधुनिक यंत्राच्या साह्याने शेती केली जात असली, तरी ठराविक कामे बैलांच्या साह्याने केली जातात. आता बर्‍याच शेतकर्‍यांकडे ट्रॅक्टर आहे शेतीची नांगरणी बैलजोडीने किंवा ट्रॅक्टरद्वारे करतांना दिसून येते आहे. खर्डा शहरात प्रत्येक कृषी सेवा केंद्रात बी बियाणे यांचा साठा मोठ्या प्रमाणात आहे १३ जूनपासून मृग नक्षत्राला प्रारंभ होत आहे. त्यामुळे शेतकरी शेतात नांगरणी, वखरणी नंतर जमीन पेरणी योग्य करून ठेवत आहे. यंदा पेरणीस लवकर सुरुवात होणार अशी खात्री शेतकर्‍यांना आहे. त्यामुळे पेरणीच्या कामांना वेग आला आहे.

100
5241 views