logo

समृद्धी महामार्गावर खाजगी बस उलटून अपघात.


इरफान शाह आयमा न्युज मेहकर ( बुलढाणा):-

समृद्धी महामार्गावरच खाजगी बस उलटून अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. आज ५ जूनच्या पहाटे डोणगाव नजीक ही दुर्घटना घडली.
छत्तीसगड येथून पुण्याकडे जाणारी सीजी. ०९ जे. आर. ७००२ क्रमांकाची खाजगी बस पहाटे डोणगाव जवळ पोहोचली. दरम्यान, चालकाला डुलकी लागल्याने बस पलटली. बसमध्ये जवळपास ५६ प्रवासी असल्याची माहिती आहे. या अपघातामध्ये दोन प्रवासी जखमी झाले असून देवसिंग धुर्वे व राजबब्बर, (रा. कबीरधाम) अशी जखमींची नावे आहेत. घटनेची माहिती मिळतात महामार्ग पोलीसांनी घटनास्थळ गाठले. परिसरातील रुग्णवाहिकेतून जखमींना मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. इतर किरकोळ जखमी प्रवाशांवर उपचार करण्यात आले असून त्यांची पर्यायी प्रवासाची व्यवस्था करण्यात आली. घटनेचा पुढील तपास डोणगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार अमरनाथ नागरे करीत आहेत.

39
5648 views