logo

लोकसभेचा देशातील हा सर्वात मोठा एक्झिट पोल सर्वेक्षण …

स्कूल ऑफ पॉलिटिक्स ने संगणकावर आधारित टेलिफोनीक इंटरव्हू (CATI) वर आधारित आणि AI च्या साह्याने ओपिनियन आणि एक्झिट पोलचे आयोजन केले होते . देशभरातील सुमारे २ दशलक्ष सॅम्पलचे सर्वेक्षण केले गेले. यामध्ये प्रत्येक लोकसभेसाठी प्रत्येक सर्वेक्षणातील सॅम्पल साईझ ३००० इतका होता.
स्कूल ऑफ पॉलिटिक्सच्या संगणकावर आधारित टेलिफोनीक इंटरव्हू (CATI)वर आधारित आणि यशस्वी AI-सक्षम मतदानाच्या संयोजनामुळे सर्वेक्षणात व्यापक लोकसांख्यिकीय सहभाग शक्य झाला.यामुळे डेटा मिळविण्यासाठी साक्षरतेचा अडथळा आला नाही. याव्यतिरिक्त, रिअल-टाइम डेटा संकलन आणि आवाजाद्वारे विश्लेषण यामुळे सर्वेक्षण प्रक्रियेला गती मिळाली व जलद आणि अधिक अचूक परिणाम शक्य झाले. २०१९ च्या निवडणुकीत देखील,स्कूल ऑफ पॉलिटिक्सचे ९० टक्के निकालांचे अंदाज अचूक ठरले होते. तसेच गेल्या दीड वर्षात, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणासह अनेक राज्यांसाठी देखील त्यांचे सर्वेक्षण अचूक ठरले आहे.

128
7062 views