logo

शिवसेना उपजिल्हा प्रमुख दीपक बोरकर यांचे "श्री " चरनी साकडे

प्रतिनिधी :AIMA Media Buldana.
बुलढाणा लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून निकालासाठी अवघे काही तास बाकी आहे त्यामुळे राज सत्तेच्या माध्यमातून सतत शेतकरी शेतमजूर व कष्टकरी यांच्या साठी अहोरात्र झटणाऱ्या भूमिपुत्र खासदार प्रतापराव जाधव यांच्या विजयासाठी खामगाव ते शेगाव अशी पायदळ वारी करत श्री चरणी दीपक बोरकर व त्यांच्या शिवसैनिकांनी साकडे घातले.
दीपक बोरकर हे भाऊ च्या विजया साठी खुप धडपड करत होते.लोकसभा निवडणुकीसाठी खासदार प्रतापराव जाधव यांच्या उमेदवारी बाबत अनेक चर्चा सांगत असताना दीपक बोरकर हे खासदार प्रतापराव जाधव यांनाच उमेदवारी मिळणार म्हणून निसंकोच होते व मनामध्ये कुठलाही संकोच न ठेवता त्यांनी शिवसैनिकांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या होत्या, लोकसभा निवडणुकीत देखील पायाला भिंगरी लावून संपूर्ण तालुका पिंजून काढला अनेक ठिकाणच्या असलेल्या नाराजा दूर करण्याचा प्रयत्न दीपक बोरकर यांच्या माध्यमातून झाला आणि त्याला यश देखील मिळाल आणी लढाई अंतिम टप्प्यात असताना विजयासाठी श्रींना साकडे घालण्याची संकल्पना दीपक बोरकर यांनी मांडली आणि शिवसैनिक देखील मोठ्या उत्साहात त्यामध्ये सहभागी झाले.
यावेळी मेहकर मतदार संघाचे आमदार संजय रायमुलकर यांच्या सुविद्य पत्नी रंजनाताई रायमुलकर ,शिवसेना उपजिल्हाप्रमुख दीपक बोरकर ,शिवसेना युवा नेते योगेश जाधव ,तुषार शिपणे ,सिंदखेडराजा मतदारसंघ तालुका प्रवक्ता विकास गवई , विभाग प्रमुख विठ्ठल माने , सुभाष सवडे,गणेश जायभाये ,अशोक कांबळे ,उपशहर प्रमुख राजेश सपाटे ,प्रभाकर बोरकर,गजानन गिरी ,कैलास काळुसे सुनील मांटे ,निखिल डिगोळे अरविंद खांडेभराड, यांच्या सह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आणि अन्य मंडळी उपस्थितीत होते

94
12099 views