logo

पुणे अपघातानंतर पब आणि बारवर पोलिसांच्या धाडी, प्रत्येक टेबलावर जाऊन चौकशी, आधारकार्ड मागताच पोरा-पोरींची तारांबळ

अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि CCTV च्या मदतीने राज्य उत्पादन विभागांचे अधिकारी कार्यालयातून परिसरातील बार व रेस्टॉरंटमध्ये होणारे अवैध धंदे, नियमांचे होणारे उल्लंघन यावर नजर ठेवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नियमांचं उल्लघंन करणाऱ्या पब आणि बार रेस्टॉरंट भोवतीचा फास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून आवळला जाणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाईंनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत पुण्यासारखा प्रकार रोखण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि CCTV च्या मदतीने राज्य उत्पादन विभागांचे अधिकारी कार्यालयातून परिसरातील बार व रेस्टॉरंटमध्ये होणारे अवैध धंदे, नियमांचे होणारे उल्लंघन यावर नजर ठेवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


पोर्शे कार अपघातानंतर अल्पवयीन मुलं व्यसनाच्या आहारी जातायेत का? हा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी अॅक्टिव्ह मोड मध्ये आली आहे. शहरातील रस्ते अन् गल्ली-बोळातून ते दुचाकीवर रात्र गस्त घालतायेत. या दरम्यान येणारे पब, हुक्का पार्लर आणि बारमध्ये अल्पवयीन मुलांना प्रवेश दिला जातोय का? अल्पवयीन मुलं कुठं गैरकृत्य करतायेत का? यावर आता पोलीस करडी नजर ठेवत आहेत .


अल्पवयीन मुलं व्यसनाच्या आहारी जातायेत का? 

 पोर्शे कार अपघातानंतर पिंपरी चिंचवड पोलीस खडबडून जागी झालीये, ती अॅक्टिव्ह मोड मध्ये आलीये. त्यांच्याकडून रात्री  कारवाई सुरु आहे.  पोर्शे कार अपघातानंतर अल्पवयीन मुलं व्यसनाच्या आहारी जातायेत का? हा मुद्दा ऐरणीवर आला. त्यासोबतच पोलीस हे रोखण्यासाठी काही पावलं उचलत आहेत का? असा प्रश्न ही विचारला जाऊ लागला. त्याच अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलिसांनी रात्री अशी गस्त सुरू केलीये. या गस्ती दरम्यान पोलीस पब, हुक्का पार्लरमध्ये धाडी टाकतायेत. तिथं अल्पवयीन मुलांना प्रवेश दिला जातोय का? याची छाननी करतीये. त्यासोबतच जिथं लहान-लहान मुलांचे अड्डे असतात, यावर ही करडी नजर ठेवत आहे.  

3
1001 views