logo

प्रतापगडाचे शिलेदार शिवसेना उपजिल्हाप्रमुख दीपक बोरकर यांचे "श्री" चरणी साकडे.

प्रतिनिधी : AIMA Media बुलडाणा
सलग15 वर्षापासून बुलडाणा जिल्ह्याची एकहाती सत्ता व वर्चस्व असनारे प्रतापराव जाधव हे चौथ्यांदा लोकसभेच्या रींगणामधे उभे आहेत व त्यांच्या विजयासाठी दीपक बोरकर यांनी शेगावीचा राजा संतश्रेष्ठ गजानन महाराज यांना खामगाव ते शेगाव पायी पायी पदयात्रा काढून साकडे घातले व त्यांना दे.राजातील बहुसंख्य शिवसैनिकांनी उस्पूर्त प्रतिसाद सुध्दा दिला व एक आगळा वेगळा उपक्रम त्यानिमित्ताने यशस्वी पार पडला.AIMA Media ने सदर कार्यक्रमाचा व लोकसभा निवडणुकीचा आढावा व लेखा जोखा घेतला असता दीपक बोरकर यांची भाऊ च्या विजया साठी धडपड,लोकसभा निवडणुकीसाठी खासदार प्रतापराव जाधव यांच्या उमेदवारी बाबत अनेक चर्चा सांगत असताना दीपक बोरकर हे खासदार प्रतापराव जाधव यांनाच उमेदवारी मिळणार म्हणून निसंकोच होते व मनामध्ये कुठलाही संकोच न ठेवता त्यांनी शिवसैनिकांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या होत्या, लोकसभा निवडणुकीत देखील पायाला भिंगरी लावून संपूर्ण तालुका पिंजून काढला अनेक ठिकाणच्या असलेल्या नाराजा दूर करण्याचा प्रयत्न दीपक बोरकर यांच्या माध्यमातून झाला आणि त्याला यश देखील मिळाल आणी लढाई अंतिम टप्प्यात असताना विजयासाठी श्रींना साकडे घालण्याची संकल्पना दीपक बोरकर यांनी मांडली आणि शिवसैनिक देखील मोठ्या उत्साहात त्यामध्ये सहभागी झाले.
यावेळी मेहकर मतदार संघाचे आमदार संजय रायमुलकर यांच्या सुविद्य पत्नी रंजनाताई रायमुलकर ,शिवसेना उपजिल्हाप्रमुख दीपक बोरकर ,शिवसेना युवा नेते योगेश जाधव ,तुषार शिपणे ,सिंदखेडराजा मतदारसंघ तालुका प्रवक्ता विकास गवई , विभाग प्रमुख विठ्ठल माने , सुभाष सवडे,गणेश जायभाय अशोक कांबळे उपशहर प्रमुख राजेश सपाटे ,प्रभाकर बोरकर,कैलास काळुसे सुनील मांटे ,निखिल डिगोळे अरविंद खांडेभराड, यांच्या सह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आणि अन्य मंडळी उपस्थितीत होते.

41
6578 views