आरती लासुरे हिने येवला तालुक्यात बारावी सायन्स मध्ये पटकावला द्वितीय क्रमांक
प्रेस नोट
२५ जुलै २०२४, येवला
आरती लासुरे हिने येवला तालुक्यात बारावी सायन्स मध्ये पटकावला द्वितीय क्रमांक
नुकत्याच लागलेल्या बारावीच्या २०२४ चा निकालामध्ये पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे, स्वामी मुक्तानंद विद्यालय येवला येथील विद्यार्थिनी आरती भाऊराव लासुरे यांनी 80 टक्के गुण मिळवून येवला तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. आरतीचे कौतुक सर्व येवला तालुक्यात होत आहे, महेंद्र कुमार काले जिल्हा परिषद सदस्य, बोकटे गावचे सरपंच प्रताप दाभाडे, राजेंद्र दाभाडे,यांच्या हस्ते आरतीचा सत्कार करण्यात आला, भाऊराव लासुरे, निवृत्ती लासूरे, सोपान लासुरे हे उपस्थित होते,
तसेच गंगागिरी महाराज संस्थान सरला बेट येथील मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते आरती भाऊराव लासुरे हिचा सत्कार करण्यात आला व भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या,