logo

10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्या प्रकरणी तलाठ्यावर गुन्हा दाखल*

SHAIKH ASIF SHAIKH YUSUF BULDANA MAHARASHTRA AIMA न्यूज

◼️ *10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्या प्रकरणी तलाठ्यावर गुन्हा दाखल*

_शेगाव येथे एसीबीची कारवाई_

बुलढाणा, 21 मे (AIMA न्यूज) : 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्या प्रकरणी तलाठ्यावर गुन्हा दाखल पातुर्डा येथील तलाठयावर एसीबीची कारवाई. तालुक्यातील आस्वंद शेत जमीन तक्रारदार यांचा आतेभाऊ यांचे नावे खरेदी केली असुन सदर खरेदीनंतर शेतीचा फेरफार घेवुन सातबारा उताऱ्यावर तकारदार यांचे आतेभावाचे नाव घेण्यासाठी व खरेदीसाठी मोबदला म्हणुन तलाठी पंजाबराव जाधव, पातुर्डा खुर्द हे 10 हजार रुपयाच्या लाचेची मागणी करीत असल्याबाबत तकार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलडाणा यांच्याकडे केली होती.
त्यानुसार दिनांक 13 मे रोजी लाचमागणी कार्यवाही करण्यात आली, तलाठी पंजाबराव जाधव पातुर्डा ता. संग्रामपुर जि. बुलढाणा तक्रारदार यांचेकडे 8 हजार रुपये लाच मागणी करुन सदर लाच रक्कम तात्काळ घेवुन येण्यास सांगीतले. परंतु आरोपी यांना तकारदार यांचेवर संशय आल्याने त्यांनी लाच रक्कम स्विकारली नाही. त्यावरुन आरोपी यांना ताब्यात घेवुन त्यांचेविरुद्ध लाच मागणीबाबत पोलीस स्टेशन शेगांव शहर येथे कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ प्रमाणे दिनांक 21मे रोजी गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे. सदरची कार्यवाही श्रीमती शितल घोगरे, पोलीस उपअधिक्षक, ॲंन्टी करप्शन ब्युरो, बुलढाणा यांचे मार्गदर्शनाखाली अधिकारी तसेच तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सचिन इंगळे, मदत पथक सफौ श्याम भांगे, पोहेकों प्रविण बैरागी, पोना जगदीश पवार, पोना विनोद लोखंडे, पोकों रंजित व्यवहारे, चानापोकों नितीन शेटे, चालक पोकों अर्शद शेख ॲंन्टी करप्शन ब्युरो, बुलडाणा यांनी पार पाडली.

28
12350 views