पुण्यामध्ये हिट व रन केस
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांचा मुलगा वेदांत अगरवाल याने आपली आलीशान गाडी भरधाव वेगाने चालवत अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा ( रा. मध्य प्रदेश) नावाच्या तरुण तरुणीला चिरडले. वेदांत अगरवाल विरोधात गुन्हा ही दाखल झाला. परंतु सर्व sections bailable होते त्यामुळे त्याची तत्काळ जामीनावर सुटका करण्यात आली. परंतु हे प्रकरण दाबण्याचा कसा प्रयत्न झाला, कोणी काय भूमिका घेतली ? शहरातील नाईट कल्चर आणि नाईट लाईफ हादरवून टाकणार्या घटनेचा हा Ground Report. नुकतीच 12 वी झालेला वेदांत शनिवारी रात्री मित्रांसोबत graduation party करण्यासाठी गेला होता. जाताना वडीलांची (विशाल अगरवाल) यांची आलीशान Porsche car घेऊन तो मुंढव्यातील Cosie रेस्टॉरंटमध्ये गेला. शहरातील बड्या उद्योजकांच्या 60 ते 70 मुलांनी Cosie restaurant मध्ये दारु ची पार्टी केली. त्यानंतर वेदांत आणि त्याचे ठरावीक मित्र Marriott suits मधील Black नावाच्या पबमध्ये गेले. Black मधील पार्टी संपवून वेदांत ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि ड्रायव्हरला शेजारी बसवले. त्याचे दोन मित्र देखील गाडीत मागे बसलेले होते. दारूच्या नशेत वेदांत ने गाडीचा स्पीड वाढवला , ट्रम्प टाँवर समोर आल्यानंतर त्याचा कंट्रोल सुटला आणि त्याने समोरच्या पल्सरला धडक दिली. त्यांनंतर एका स्वीफ्ट कारला धडक दिली. Ballr पब मधील स्टाफ ने घटनास्थळी धाव घेतली. यातील काही प्रत्यक्षदर्शींनी स्कूपला दिलेल्या माहितीनूसार ही धडक एवढी भयानक होती की मागे बसलेली अश्विनी कोस्टा सुमारे 10 ते 15 फूट हवेत उडून खाली पडली. डोक्याला मार लागल्याने तिचा जागेवर च म्रुत्यु झाला. अनिस अवधिया देखील गंभीर जखमी होऊन तडफडत पडला होता, त्याची हालचाल बघून काही तरुणांनी त्याला उचलून एका रिक्षामध्ये टाकले आणि नगर रोडवरील सह्याद्री हाँस्पीटलमध्ये नेले, परंतु हाँस्पीटलमध्ये पोचण्यापूर्वीच त्याचाही म्रुत्यु झाला. या दोन्ही तरूण तरूणी कडे कोणाचेही लक्ष नव्हते. आमदारांनी अगरवाल यांची बाजू मांडण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. सुरूवातीला वेदांत अल्पवयीन असल्याचा ड्रामा करण्यात आला. तो देखील फार काळ टिकला नाही. अगदी सलमान खान हीट अँण्ड रन केसप्रमाणे ड्रायव्हर ला ही उभे करण्यात आले, परंतु प्रत्यक्षदर्शींनी मात्र मयत तरुण आणि तरूणीची बाजू मांडली. गाडी वेदांत च चालवत होता आणि ड्रायव्हर बाजूला बसलेला होता याचे व्हीडीओ पुरावे त्यांनी पोलिसांना दिले. येथे कारवाई चा पाठपुरावा करणाऱ्यांना देखील शांत राहण्यासाठी आँफर दिली जात होती. अखेर येरवडा पोलिसांनी वेदांत अगरवाल विरुद्ध गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली. बर्याच केसेसमध्ये उशिरा अटक दाखवून , आरोपीला कायद्याचा धाक रहावा या उद्देशाने एक दिवस कोठडीमध्ये ठेवण्यात येते. येथे मात्र तत्परतेने CRPC च्या तरतुदींचे पालन करत आरोपीला सुट्टीच्या कोर्टात हजर करण्यात आले. सर्व सेक्शन्स Bailable असल्यामुळे वेदांत चा तात्काळ जामीन झाला. या प्रकरणामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले. मुंढव्यातील Cosie restaurant आणि Merriott suits मध्ये अल्पवयीन मुलांना दारु विक्री केली जात असूनही कारवाई का झाली नाही.? येथील cctv footage तपासले तर भयानक चित्र समोर दिसेल . Excise department ने याबाबत काय कारवाई केली? दोन जणांचा जीव गेल्यानंतरही एफआयआर मध्ये bailable sections का दाखल करण्यात आले? अपघातात म्रुत्यु झालेल्या मुलांच्या आई वडिलांची flight miss झाली. त्यांना by road येण्यासाठी लागणारा वेळ आणि होणारी घालमेल याची दखल कोण घेणार ?रात्रभर पार्टी करून पहाटे दोघांच्या म्रुत्युस कारणीभूत ठरलेल्या वेदांत अगरवाल याला आई वडील crocin घेऊन आले होते, परंतु पोटच्या मुलांचे म्रुतदेह घरी घेऊन जाताना 'त्या दोघांच्या' आई बापाची काय अवस्था असेल? Saturday night enjoy करणाऱ्या अल्पवयीन मुलांना सर्रास दारु serve करणाऱ्या रेस्टॉरंट विरुद्ध पोलीस आयुक्त काय कारवाई करणार? संबंधीत आलीशान गाडी विशाल अगरवाल यांच्या नावावर रजिस्टर आहे . मार्चमध्ये या गाडीचे रजिस्ट्रेशन झाले असले तरी आरटीओ कडून अद्याप नंबर दिला गेलेला नसल्याचे समजते. तरीही ही गाडी रोडवर कशी येते ? याबाबत काही कारवाई होणार का ?