logo

नाडी परीक्षण आरोग्य शिबिर संपन्न

पुणे दिनांक १८ मे : महाराष्ट्र राज्य कृतिशील निवृत्त अधिकारी कर्मचारी संघटना, पुणे यांच्या वतीने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नाडीतज्ञ डॉ. नजम अली कादरी (एम. डी. आयुर्वेद अँड एम डी गायनॅक) यांच्या मार्गदर्शनाखाली दुसरे नाडी परीक्षण शिबिर नुकतेच पार पडले. हे शिबिर पुण्यातील शिक्षक भवन येथे आयोजित करण्यात आले होते. शिक्षण उपसंचालक दीपक चवणे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. याप्रसंगी उपकोषाध्यक्ष गिरीश सांगळे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. कादरी यांनी आरोग्य आणि आयुर्वेदाबाबत उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. संघटनेचे सदस्य चंद्रमोहन हंगेकर, मुख्य अभियंता (सेवानिवृत्त) यांनी आरोग्य तपासणीचे महत्त्व विशद केले. यावेळी दशरथ बनसोडे, निवृत्त न्यायाधीश तसेच अरुण कांबळे, निवृत्त कार्यकारी संचालक, जलसंपदा विभाग हेही हजर होते. नाडी परीक्षण शिबिरामध्ये सभासदांची आरोग्य तपासणी अत्यंत माफक दरात केली जाते. पुणे जिल्ह्यातील ९१ महिला व पुरुषांनी सदर नाडी तपासणीचा लाभ घेतला. आरोग्य शिबिर यशस्वी करण्यामध्ये संस्थेचे सभासद टी. के. गुरव, गिरीश सांगळे, बाळासाहेब गोरे, लक्ष्मण गुळवे, लक्ष्मण पोळ, भारत बेंद्रे, तसेच शिक्षक भवन मधील कर्मचारी वर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले. असेच शिबिर सातारा, सांगली, नगर येथेही आयोजित करण्यात येणार असल्याचे मनोहर पोकळे यांनी सांगितले.

53
16569 views