logo

नववी पास तरुणाने युट्युब वर बघून छापल्या बनावट नोटा

पनवेल:AIMA MEDIA
पैसे खर्च करण्यासाठी चक्क युट्युब वर बघून घरातच बनावट नोटांचा छापखाना चालवणारा इयत्ता नववी तरुणाला पनवेल पोलिसांनी तळोजा येथे अटक केली त्याच्याकडून दोन लाख तीन हजार रुपयाच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या धक्कादायक बाब म्हणजे त्याने आतापर्यंत एक लाख रुपयाच्या बनावट नोटा चलनात आणल्याचे तपासात समोर आले
अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव प्रफुल्ल गोविंद पाटील (वय 26 ) असून त्याला तळोजा एमआयडीसी परिसरातून अटक करण्यात आले बनावट नोटा छापल्या जात असल्याची माहिती मिळाल्यावर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुधवारी रात्री सापळा रचून प्रफुल्ला अटक करण्यात आले त्याच्या खिशात बनावट नोटा आढळल्या घराची झडती घेतली असता बनावट नोटांचा छापखाना उघडकीस आला त्याने छापलेल्या दोन लाख रुपयांच्या 1483 बनावट नोटा आढळल्या त्यामध्ये 50 च्या 574 , व 100 च्या 33 व 200 च्या 853 बनावट नोटांचा समावेश आहे

51
3098 views