Ahmednagar Crime : अहमदनगर शहरात पुन्हा एकदा टोळीयुद्ध; भर बाजारपेठेत तरुणाला दांडक्याने मारहाण
अहमदनगर : अहमदनगर शहरात (Ahmednagar Crime) पुन्हा एकदा टोळी युद्धातून भर बाजारपेठेत तरुणाला दांडक्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. शहरातील मुख्य बाजार पेठेत दोन गटातील वादातून ही हाणामारी झाली. तरुणाला मारहाण झालेली घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या मारहाण प्रकरणात अद्याप पोलिसांकडे गुन्हा दाखल झालेला नाही. मागील आठवड्यात जाधव-मूर्तडक गटात झालेल्या हाणामारीतून ही मारहाण झाल्याची माहिती आहे.