logo

कळमेश्वर तालुक्यातील दहेगाव येथे सरकारी अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने अनधिकृत लेआउटची विक्री


मौजा दहेगाव तहसील कळमेश्वर जिल्हा नागपूर येथील जमीन सर्वे क्रमांक 38 क्षेत्र 1 हेक्टर 17 मधून 0.55 आर शेतीत काही वर्षांपूर्वी लेआउट टाकण्यात आले. त्या लेआउट मध्ये कुठल्याही प्रकारची डेव्हलपमेंट न करता व कुठल्याही प्रकारची मान्यता न घेता लेआउट मधील प्लॉटची विक्री सुरू केली. ग्राम पंचायत चे अधिकारी व लेआऊट धारक यांनी साठगाठ करून अधिकार नसताना सुद्धा त्या लेआउटला गावठाण प्रमाणपत्र दिले व कर आकारणी करून कर पावती लावून दिली व त्या लेआउटची आखीव पत्रिका व नकाशा प्रत नसताना सुद्धा प्लॉटधारकाने बोगस पद्धतीने अधिकाऱ्यांना हातात घेऊन बोगस रजिस्ट्री मारलेली दिसत आहे.ज्याच्या आधारावर त्या प्लॉटची रजिस्ट्री लावण्यात आली व रजिस्ट्रीमध्ये सुद्धा खाली प्लॉटला घराची जागा दाखवून रजिस्ट्री लावण्यात आली. ते लेआउट पूर्णपणे अनधिकृत असून आता नवनवीन ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांच्यावर दबाव टाकून त्या ग्रामपंचायत कडून अनुमती द्यावी असे पीडित प्लॉट धारक व फसवी गिरी व बोगस लेआउट मालकाकडून दबाव टाकण्यात येत आहे व कुठेतरी सरकारी अधिकारी यात समाविष्ट दिसत आहे कळमेश्वर तालुक्यात वारंवार भूखंड माफिया बाबत बोकस कारभार दिसून येतो याला कुठेतरी आळा बसावा अशी जनतेची मागणी दिसत आहे व लेआउट धारकावर व या कारभारात सामील असलेल्या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जनतेची आहे.

तालुका प्रतिनिधी
सुमित ल. गमे

5
3633 views