logo

मोदींच्या ‘त्या’ प्रश्नावर अखेर उद्धव ठाकरे यांचं जोरदार उत्तर; म्हणाले, तुमच्यासोबत राहून…

मोदींच्या ‘त्या’ प्रश्नावर अखेर उद्धव ठाकरे यांचं जोरदार उत्तर; म्हणाले, तुमच्यासोबत राहून…
नाशिक :- सुरतेचे दोन बोके छत्रपतींचा महाराष्ट्र लुटत आहेत. आम्ही त्यांना मत काय? किंमतही देत नाही. बाळासाहेब बाळासाहेब बोलू नका. त्यांना हिंदुहृदयसम्राट म्हणा. ते तुमच्यासारखे नकली विश्वगुरू नव्हते. तुमच्यासारख्या बोगस डिग्र्या घेऊन फिरत नव्हते. शिवरायांची शपथ घेऊन सांगतो, महाराष्ट्राला वैभव परत आणून दिल्याशिवाय राहणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.नकली सेना निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांच्या प्रश्नावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर उत्तर दिलं आगहे. गेली 30 वर्ष आम्ही तुमच्यासोबत होतो. तुमच्याकडून दगाफटका खाऊनही आम्ही तुमच्यासोबत राहिलो. तरीही आम्ही भाजपमध्ये गेलो नाही. तर काँग्रेसमध्ये कसे जाणार? असा सवाल करतानाच जोपर्यंत हे समोर बसलेले शिवसैनिक आहेत. तोपर्यंत मला चिंता नाही. तुम्ही भाजपची चिंता करा, असा चिमटा उद्धव ठाकरे यांनी काढला.

1
1618 views