logo

नशापान करणाऱ्याला समज देणाऱ्यांवर सवणस येथे कोयत्याने वार


खेड तालुक्यातील सवणस खुर्द या गावांमध्ये एका इसमावर कोयत्याने वार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत खेड पोलीस ठाण्यामध्ये शेख दाऊद आदम सुर्वे (वय 45/ राहणार सवणस खुर्द तालुका खेड) यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की माझ्या घरासमोर एसटी शेड असून या शेडमध्ये साकिब अब्दुल सलाम सुर्वे हा नेहमी येऊन त्या ठिकाणी नशापान करत असतो म्हणून मी त्याला दोन वेळा समज दिली होती याच्या मनात राग धरून दिनांक 8 मे रोजी रात्री 10.30 वा. च्या सुमारास मी माझ्या मित्रा बरोबर मशिदीसमोर उभा असताना त्या ठिकाणी साकिब सुर्वे आणि त्याचा मोठा भाऊ तलत अब्दुल सलाम सुर्वे (वय 44) येऊन शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीमध्ये करण्यात आला आहे. साकिब यांनी आपल्या घरामध्ये धावत जाऊन कोयता घेऊन आला व वार केले असे फिर्यादीमध्ये शेख दाउद आदम सुर्वे यांनी नमुद केले आहे. त्या अन्वये खेड पोलिस स्थानकात भादवि कलम 326 504 506 34 प्रमाणे गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपीला खेड पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या मार्गदर्शन खाली खेड पोलीस तपास करीत आहेत.

19
1023 views