logo

साखरखेर्डा येथे ई कलास जमिनी चे वादातून चौघा भावात भांडण एकाचा मृत्यू तर दोन जखमी

जुबेर शाह (साखरखेर्डा)

साखरखेर्डा. सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा येथे मेहकर रोडवरील महालक्ष्मी तलाव जवळील ई कलास जग्यावरून चौघा भावात १९ एप्रिल रोजी लठ्याकाठ्यांनी तुंबळ हाणामारी झाली होती यात तिघे गंभीर झाले होते त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. मृतकाचे नाव एकनाथ सीताराम टाले वय ३० वर्ष या बाबत माहिती अशी की , साखरखेर्डा येथील सिताराम टाले यांना ७ मुले आहेत .३५ वर्षापूर्वी पित्याचे छत्र हरपले आई ने रामदास , भानूदास ,देविदास, हरिभाऊ, पांडुरंग, अंबादास, एकनाथ यांचा मोल मजुरी करून संभाड केला . रामदास,भानुदास, अंबादास,देविदासहे मोल मजुरी करून शेती व्यवसायाकडे वळले.तर लहान भावांनी महालक्ष्मी तलावरच्या काठावर ई कलास जमिनी वर दमदार धाबा सुरू केला. तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून लहान वयात अल्पवधिच त्यांनी व्यवसायात जम बसवला होता तिघांचे ही विवाह झाले होते. मालक कोन अनही नौकर कोन यातील फरक कळवत नव्हता २५ वर्षापासून सुरू असलेल्या व्यवसायावर देविदास यांची नजर लागली ही जागा मलाच हवी अशी मागणी करून तिघांनी लहान भावाला जिवे मारण्याची धमकी दिवलाग्ला तिघांनी बाजूची जागा तुला देतो तुम्ही भांडण करू नका म्हणून गयावया तिघांनी मिळून केली परंतु मला हीच जागा पाहिजे असा हट्ट घरून देविदास यांच्या अंगात देवदास संचारला .दोन मुला ला सोबत घेऊन तिघाभवाचा काटा कळण्यासाठी हातात लाठ्याकाठ्या लोखंडी रॉड घेऊन १९ एप्रिल रोजी सकाळी अचानक हल्ला केला बेसावध असलेल्या तिघे हरिभाऊ, पांडुरंग , एकनाथ यांच्या डोक्यात जबर मारहाण झल्यांनी तिघे ही लहान भाऊ गंभीर जखमी झाले बेशुद्ध अवस्तिथ तिघांना चिखली येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तिघेही कोमात असल्याने त्यातील एकनाथ याचा आज ८ मे रोजी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला तर दोघांवर अघाप उपचार सुरू आहेत . फिर्यादी पांडुरंग सिताराम टाळे, यांनी ३० एप्रिल रोजी या प्रकरणी साखरखेर्डा पोलीस स्टेशन मध्य तक्रार दाखल केली .या नंतर पोलिसांनी आरोपी देविदास सिताराम टाळे,पवन देविदास टाळे, श्रीकृष्ण देविदास टाळे, यांच्या विरोधात कलम ३२४,५०४,५०६, ३४ परमाने गुन्हा दाखल केला होता . काल रात्री ३०७ दाखल केला तर आज ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे ठाणेदार सोपणील नाईक यांनी सांगितले यातील मुख्य आरोपी देविदास सिताराम टाळे, पवन देविदास टाळे, श्रीकृष्ण देविदास टाळे,यांना साखरखेर्डा पोलिसांनी केले आहे.

315
10130 views