logo

चुरशीच्या लढतीत बारामतीमध्ये मतदानाचा टक्का घसरला; अजित पवार काय म्हणाले?

अवघ्या राज्याचे नव्हे, तर देशाचे लक्ष लागून बारामतीसाठी लोकसभेला सर्वात कमी मतदान झाल्याने नेमका कोणाला तोटा होणार आणि कोणाला फायदा होणार? याची चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांच्यात बारामतीमध्ये लढत होत आहे. मात्र, अपेक्षित मतदान न होता थेट 2019 च्या तुलनेत टक्का घसरल्याने दोन्ही गटातही अस्वस्थता आहे. पैशांचा वापर झाल्याचाही आरोप होत आहे. अजित पवार यांनी बारामतीमध्ये घटलेल्या मताधिक्यावर भाष्य केलं आहे.

5
1069 views