logo

भगुर येथे पाण्यामुळे बुडतो आहे गरीबांचा रोजगार .


सध्या नाशिक जिल्ह्यात पणी टंचाई भेडसावत आहे , धरणाचा पाणीसाठा कमी झाल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी कपात सुरू आहे.त्या अनुषंगाने भगुर नगर परिषदेने देखील या भीषण पणी टंचाईवर इलाज म्हणून एक दिवसा आड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि गेल्या काही दिवसापासून एक दिवसा आड नळाला पाणी सोडण्यात येत आहे.
पण ज्या वेळेवर पाणी सोडण्यात येत होते त्या ठराविक वेळेवर पाणी सोडण्यात येत नसून मनमानीपणे जेह्वा वाटेल तेव्हा या प्रकाराने पाणी सोडण्यात येत असल्याने लोक हवालदिल झाले आहेत.
ठराविक वेळेवर पाणी येत नसल्याने आणि पाणी देखील गरजेचे असल्याने लोकांना आपले रोजगार आणि काम धंदे सोडून पाण्याची वाट बघत बसावे लागत असल्याने जनतेतून नाराजीचा सूर उमटत आहे.
पाणी भरण्यासाठी घरी थांबले तर रोजगार बुडतो आणि रोजगार पाहण्यासाठी कामावर गेले तर पाणी मिळत नाही अशी परिस्थिती भगुरकरांची झाली आहे.
तरी नगर परिषदेचा अधिकाऱ्याने, तसेच स्थानिक नेते मंडळींनी या कडे लक्ष घालावे , भले दिवसा आड पाणी ध्या पण पणी पुरवठा मनमानी वेळेवर न करता ठराविक वेळेवर करावा अशी भगुर शहर वासियांची अपेक्षा आहे.

38
4973 views