logo

लोकसभा च्या मतदान प्रक्रियेमध्ये महिला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखविला

*मतदान प्रक्रियेत महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*

महेंद्र महाजन

रिसोड, ता. २६ : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा आज दि.२६ एप्रिल रोजी पार पडत असून, मतदान प्रक्रिया सुरू आहे. त्या अनुषंगाने अकोला लोकसभा मतदारसंघातील रिसोड तालुक्यातील ग्रामीण भागातील मतदान केंद्राचा आढावा घेतला असता मतदान प्रक्रियेत महिला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहावयास मिळाला आहे.
विशेष बाब म्हणजे ग्रामीण भागातील अनेक मतदान केंद्रावर प्रत्यक्ष भेट दिली असता प्रत्येक बुधवर महिलांचीच रंग मोठी होती. दुपारी दोन वाजेपर्यंत काही मतदान केंद्रावर पुरुषपिक्षा महिलांची टक्केवारी जास्त होती. बऱ्याच ने. केंद्रावर महिलांची टक्केवारी पुरुयांच्या बरोबरीने पाहावयास मिळाली. परिणामी सायंकाळी मतदान प्रक्रिया बंद झाल्यानंतर बाहेर येणाऱ्या आकडेवारीत महिलाच अग्रेसर राहणार असल्याचे बोलले जात आहे.
आज सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. दुपारी एक वाजेपर्यंत संपूर्ण रिसोड - तालुक्यात एक लाख ३ हजार ९९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला ■होता. त्यात तब्बल ४४ हजार ८६५ महिला मतदारांचा समावेश आहे. सदर
आकडेवारी संपूर्ण तालुक्याची असून, निवडणुकीच्या अनुषंगाने ग्रामीण भागातील अनेक मतदान केंद्रावर प्रत्यक्ष भेट दिली असता महिला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहावयास मिळाला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने भर जहाँगीर येथील तीन मतदार केंद्रांपैकी दोन मतदार केंद्रावर जवळपास पुरुषांच्या बरोबरीने महिला मतदारांनी हक्क बजावला होता. अशी आकडेवारी हाती आली आहे. तर शेलुखडसे येथील दोन बूथपैकी ऐका बूथवर झालेल्या ३८१ मतदानापैकी तब्बल २०० महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. तर करडा, गणेशपुर, पाचंबा, मोप आदी गावातील विविध मतदान केंद्रावर पुरुषपिक्षा महीला मतदारांचीच रांग मोठी असल्याची पाहावयास मिळली आहे.

एकंदरित वस्तुस्थिती पाहता पुरुषपिक्षा संख्या कमी असुन सुद्धा टक्केवारीत महीला पुरुषांच्या बरोबरीत आहेत. याचा अर्थ या निवडणूकीत महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. परिणामी हि बाब लोकशाहीसाठी सकारात्मक असुन महिला सशक्तीकरणासाठी महिलांनीच उचलले हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे तज्ञ लोक बोलत आहेत.

रिसोड : मतदान केंद्रावर असलेली महिलांची रांग.

50
3781 views