logo

रिसोड येथील भारत प्राथमिक शाळेमध्ये आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आले

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीमध्ये युवा मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

८० वर्षीय महिलेने केले मतदान


महेंद्र महाजन रिसोड

अकोला लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान होऊ घातला आहे अकोला लोकसभा मतदारसंघातील रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघात आज सकाळी 7 वाजता पासूनच मतदारांनी मतदान करण्यासाठी गर्दी केल्याची दिसून आले सकाळी सात वाजता रिसोड शहरातील काही मतदान केंद्रांवर नागरिकांच्या रांगा लागलेले दिसून आले निवडणुकी भागाद्वारे रिसोड शहरातील भारत माध्यमिक शाळा श्री.शिवाजी हायस्कूल,उत्तमचंद बगडीया सिनियर कॉलेज जिल्हा परिषद शाळा येथे आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आलं आहे.
या ठिकाणी मतदारांच्या स्वागतासाठी आकर्षक रांगोळी,चालते बोलते कार्टून्स साकारण्यात आली आहे या रांगोळीच्या माध्यमातून चला मतदान करूया असा संदेश देण्यात आला तर या ठिकाणी उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंट मध्ये अनेक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. विशेष बाब म्हणजे सकाळपासून सुरू झालेल्या या मतदान प्रक्रियेमध्ये महिला मतदारांचा उत्साह सर्वाधिक दिसून आला भारत माध्यमिक प्राथमिक शाळा रिसोड येथील मतदान केंद्रावर निवडणूक विभागाद्वारे मतदारांना आकर्षित करण्याकरता बाहेर गेटवर चालते बोलते कार्टून उभे ठेवण्यात आले होते हे कार्टून लोकांचे लक्ष वेधून घेत होते यासोबतच मतदान केंद्राच्या आत मध्ये काही कट आउट सुद्धा लावण्यात आले होते वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मतदान केल्यानंतर वृक्षारोपण करीत एक नवीन संदेश दिला सकाळपासून रिसोड शहरात अकोला लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली असून यावेळी वयोवृद्धांपासून ते युवा पर्यंत सर्वजण मतदान करताना उत्सुक दिसून आले .

*प्रतिक्रिया १*
मि सकाळी सात वाजता मतदान केले व माझे पहिले मतदान झाले मतदान प्रत्येकाचा अधिकार आहे व आर्थिक कार्य मतदान करायलाच पाहिजेत
*महेंद्र महाजन*
व्हाईस ऑफ मीडिया सहसंघटक रिसोड


*प्रतिक्रिया 2*
सकाळच्या प्रहात मतदान सुरू झाले आहे मतदारांचा अतिशय चांगला प्रतिसाद दिसून येत आहे सर्व मतदारानी मतदान करण्याच्या प्रक्रियेत सकाळपासून लागले आहे सर्वांना आव्हान करतो की प्रत्येकाने आपला मूलभूत मतदानाचा अधिकार बजावलाच पाहिजे

*बाळासाहेब देशमुख*
माजी अभियंता

*प्रतिक्रिया३*
माझं पहिलं मतदान आहे मतदान करून मला खूप आनंद झाला असून सर्व युवा वर्गातील मतदारांनी मतदान करून आपलं कर्तव्य पार पाडावे

*रिमा महाजन*

2
3077 views