logo

रिसोड येथील गोभणी या ठिकाणची घटना अहो ... आपल्या शेतातील विहीर गेली चोरीला..!*

आम्ही आत्तापर्यंत फक्त आणि फक्त मकरंद अनासपुरे यांच्या पिक्चर मधील घटना पहात आलो पण ही घटना अक्षरशा

(रिसोड तालुक्यातील गोभणी येथील घटना)

महेंद्र महाजन

रिसोड ता.24 एप्रिल 2024=तालुक्यातील गोभणी येथील सतीश पंजाबराव देशमुख यांनी 2013 मध्ये भगवान सखाराम चव्हाण रा.गोभणी यांचे कडून 63 आर शेत जमीन विकत घेतली सदर शेतीमध्ये शासकीय योजनेतुन सिंचन विहिरीचा लाभ मिळविण्या करीता ग्रामपंचायत गोभणी यांच्याकडे अर्ज केला असता त्या शेतामध्ये रोहयो सिंचन विहीर धडक योजने कार्यक्रमांतर्गत लाभ घेतला असल्याचे सांगण्यात आले याबाबत त्यांनी सखोल चौकशी करून कागदपत्रे मिळवुन अवलोकन केले असता रो.ह.यो सिंचन विहीर धडक कार्यक्रमांतर्गत दिनांक 15 /5/ 2009 रोजी प्रशासकीय मंजुरात आदेश क्र. रो.ह.यो / शाअ/प्र. क्र. 9/2009 नुसार लाभ घेतला आहे.परंतु प्रत्यक्षात मात्र विहिरीचे खोदकामच केले नसल्याचे उघड झाले आहे, याबाबत मात्र विहिरीच्या जागेचा आराखडा,कार्यारंभ आदेश, देयके,आकस्मिक खर्चाचे बिल, विहीर पुर्ण झाल्याचे प्रमाणपत्र असले तरी प्रत्यक्षात मात्र विहिरीचे खोदकामच झाले नसल्याची बाब समोर आली असुन 2009 ते 2011 या कालावधीत कोट्यावधी रुपयाचा अपहार झाला असल्याची शंका उपस्थित होत आहे.
याबाबत सविस्तर असे की गोभणी येथील सतीश पंजाबराव देशमुख यांनी भगवान सखाराम चव्हाण रा.गोभणी यांच्याकडून 2013 मध्ये 63 आर शेती विकत घेतली या शेतीमध्ये शासकीय योजनेतुन सिंचन विहिरीचा लाभ घेण्याकरिता ग्रामपंचायतकडे अर्ज केला असता यापुर्वीच विहिरीचा लाभ घेतला असल्याची त्यांना सांगण्यात आले त्यानंतर त्यांनी सखोल चौकशी करून कागदपत्रे मिळविली व अवलोकन केले असता या रो.ह.यो सिंचन विहीर धडक कार्यक्रमांतर्गत दिनांक 15/ 5 /2009 रोजी प्रशासकीय मंजुरात आदेश क्रमांक रो.ह.यो/
शाअ /प्र .क्र .9/2009 नुसार लाभ मिळाल्याचे समजले त्यावर तत्कालीन तहसीलदार रोहयो यांची सही आहे तसेच उप अभियंता लघु सिंचन उपविभाग जि.प.वाशिम यांची सदर कामाची एमबी चे अवलोकन केले असता सन 2009 मध्ये एक लाख मान्यता रक्कम ही भगवान सखाराम चव्हाण या लाभार्थ्या च्या नावे असून त्याचे नाव सदर रक्कम आदा केल्याचे दर्शविते परंतु प्रत्यक्षात मात्र जागेवर कोणतेही विहिरीचे काम करण्यात आलेले त्याची समोर आली आहे सदरचे जमिनीमध्ये कोणत्याही प्रकारची मोक्यावर कामाचे मोजमाप न घेता संबंधित उप अभियंता लघु सिंचन उपविभाग जि.प.वाशिम यांनी एमबी तयार केल्याचे दिसुन येत आहे.त्याचप्रमाणे शासकीय रक्कम आदा केल्याचे दिसुन येते तसेच अकस्मिक खर्चाचे बिलाचे अवलोकन केले असता सदर खर्चाच्या बिला वर गट विकास अधिकारी प.स.रिसोड व उप अभियंता लघु सिंचन उपविभाग जि प वाशिम व तत्कालीन शाखा अभियंता यांच्या 2010-11च्या देयकावर सह्या आहेत तसेच तत्कालीन तलाठी यांनी 10 मार्च 2011 रोजी सदर शेतामध्ये विहिरीचे खोदकाम व बांधकाम पुर्ण केल्याचा दाखला दिला आहे तत्कालीन तलाठी यांनी फेरफार क्रमांक 1968 अन्वये विहिरी बाबत फेरफार घेतला आहे परंतु सदर फेरफार मंजुर झाल्याचा मंडळ अधिकारी यांचा शेरा दिसुन येत नाही.सदर फेरफार व तहसील अभिलेखामधुन मिळवलेला फेरफार यामध्ये फेरफार क्रमांक तसेच फेरफार घेतल्याचा व मिळाल्याच्या तारखा यामध्ये पुर्णता बदल आहे.या सर्व बाबीवरून भगवान सखाराम चव्हाण यांनी व उप अभियंता लघु पाटबंधारे उपविभाग वाशिम तसेच शाखा अभियंता व प स रिसोड तसेच तत्कालीन तलाठी गोभणी यांनी संगणमत करून सदर योजनेअंतर्गत मोक्यावर कोणतीही विहिरीचे खोदकाम न करता शासनाच्या निधीचा दुरुपयोग केला असल्याचे उघड होत आहे आज रोजी सदर गट नंबर मध्ये कोणत्याही प्रकारची विहीर उपलब्ध नाही परंतु 7/12 चे इतर अधिकारात दिसून येते या गट नंबर मध्ये विहीर नसल्याबाबतचा तलाठी व मंडळाधिकारी यांचा 11 जून 2018 रोजी प्रत्यक्षात मोक्यावर जाऊन केलेला पंचनामा व अहवाल यामध्ये स्पष्ट नमूद आहे की सदर गटांमध्ये पाहणी केली असता कुठे विहीर आढळून आली नाही त्यामुळे मोठा अपहार झाल्याची शंका उपस्थित होत आहे
याबाबत सतीश पंजाबराव देशमुख यांनी जिल्हाधिकारी वाशिम यांच्याकडे तक्रार केली आहे याबाबत कार्यवाही करण्याकरिता देशमुख यांनी शेवटचे स्मरण पत्र एक एप्रिल 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करून दोषीवर कार्यवाही करून न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.

55
8004 views