logo

*मतदान केल्यास रुग्णांना मिळणार 50 टक्के सवलत* *इंडियन मेडिकल असोसिएशनचा कौतुकास्पद उपक्रम*

*मतदान केल्यास रुग्णांना मिळणार 50 टक्के सवलत*

*इंडियन मेडिकल असोसिएशनचा कौतुकास्पद उपक्रम*

(महेंद्र महाजन)
रिसोड - वाशिम,
जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतदान करून आलेल्या मतदारांना इंडियन मेडिकल असोसिएशन
तर्फे 26, 27 आणि 28 एप्रिल रोजी ओपीडी तपासणी मध्ये 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय असोसिएशनकडून घेण्यात आल्याचे आय एम ए चे अध्यक्ष डॉ. संतोष सारडा आणि सचिव डॉ. सोना नेनवानी यांनी कळविले आहे.
मतदानाची टक्केवारी वाढावी, शेवटच्या मतदाराने आपला हक्क बजावा या उद्देशाने जिल्हा प्रशासन आणि अनेक संस्था वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक पावले उचलत आहे. याचाच भाग म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशन वाशिम तर्फे मतदान केलेल्या मतदारास ओपीडीच्या फीस मध्ये 50% सवलत देण्याचे ठरविण्यात आले आहे.
मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत पोहोचवून त्यांच्याकडून मतदान करून घेणे तसेच लोकशाही बळकट करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे घेण्यात येत असलेल्या या कौतुकास्पद उपक्रमाचा सर्व गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन आय एम ए च्या अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आले आहे.

7
2425 views