logo

सावरगाव येथे जातीय द्वेषाच्या भावनेतुन मातंग समाजातील बॅन्ड मालक व कलाकारावर प्राणघातक हल्ला.

सावरगाव येथे जातीय द्वेषाच्या भावनेतुन मातंग समाजातील बॅन्ड मालक व कलाकारावर प्राणघातक हल्ला.

आज दिनांक 25.04.24 गुरुवार रोजी लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य व मातंग समाज एकीकरण समितीच्या वतीने मा.उपविभागीय अधिकारी काटोल, तसेच तहसीलदार साहेब काटोल संबंधित गुन्ह्यांमध्ये आरोपीस अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे Atrocity Act दाखल व्हावे व कठोरात कठोर शिक्षा व्हावी म्हणून निवेदन देण्यात आले.
दिनांक 20.4.24 रोजी सावरगाव येथे जातीय द्वेषाच्या भावनेतुन मातंग समाजातील मौजा मालापुर तालुका नरखेड येथील मातंग समाजाचे नामे संजय अभिमन्यू ठोसर मु.मालापुर वय 48 वर्षे यांच्या मालकीची श्री दादाजी धुनीवाले बॅन्ड पार्टी मालापुर येथे असुन त्यांनी भदाडी मोहगाव तालुका नरखेड येथील तेली समाजाचे नामे श्री चिंदुजी मदनकर अंदाजे वय 58 वर्ष यांच्या मुलाचे नाव मयुर चिंधुजी मदनकर अंदाजे वय 26 वर्ष लग्नाचे वाजंत्री काम करण्याचा ऑर्डर घेतला होता.संबधित ऑर्डर ठरलेल्या शर्तीनुसार ठरलेल्या किमतीनुसार पुर्ण प्रामाणिक पणे संपूर्ण गुणवत्तापुर्वक वाजंत्री काम करुन आपली व्यवसायिक जबाबदारी पार पडली.लग्न लागल्या नंतर रात्री 9.30 वाजता उर्वरित रक्कमेची मागणी श्री संजय ठोसर यांनी चिंधुजी मदनकर यांच्याकडे केली.ही मागणी करीत असतांना सोबत बॅन्ड पथकातील काही कलाकार ही होते.मात्र,चिंधुजी मदनकर यांनी यांनी आणी मयुर चिंधुजी मदनकर आणी मामा यांनी पैसे न देता जातीवाचक शिवीगाळ आणी अश्विल शिवीगाळ करून पैसे न देण्याची धमकी दिली आणी मांगाड्यांनो तुम्हची काय औकात आहे तुम्हाला पैसे नाही देत जे बनेल ते करुन टाका असे म्हटले असता बॅन्ड पथकाचे मालक संजय ठोसर यांनी त्यांची विनवणी केली व पैसे देण्यासाठी बोलु लागले.असे चालु असताना तेथे पन्नास साठ लोकांचा जमाव मदनकर व त्यांच्या कुटुंबीयांचा, नातेवाईकांचा समूह जातीवाचक शिवी देत आई बहीणीच्या अश्लील शिव्या दिल्या.नवरदेवाचा मामा पांढुर्णा निवासी यांनी श्री संजय ठोसर यांच्या डोक्यात लाकडाची झिलपीने जबर वार करून ते रक्त बंबबाळ होऊन जागीच बेशुद्ध पडले.या प्राणघातक हल्ल्यात बॅन्ड पथकातील कलाकार 1.अजय ठोसर ,2.शुभम ठोसर, 3.अनिल ठोसर यांना सुध्दा बेदाम मारण्यात आले .व मांगाड्यानो या घटनेची वाच्यता कुठे ही केल्यास आणी पोलिस तक्रार केल्यास सर्व परिवारांना जीवानीशी मारण्याची धमकी दिली.
म्हणून लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य व मातंग समाज एकीकरण समिती नागपुर यांच्या वतीने मागणी केली की संबंधित गुन्ह्यांमध्ये आरोपी विरोधात भारतीय दंड कलम अन्वये 307,326,452,143,147,148,149,504 व Atrocity Act गुन्हा दाखल करण्यात यावा व बाकी आरोपींना तत्काळ अटक करून दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी ही समस्त मातंग समाजाबांधवांची मागणी आहे.
या प्रसंगी लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य सचिव श्री गरीबा खोडके, विदर्भ सरचिटणीस श्री अंकुश बावणे, लहुजी शक्ती सेना नागपूर जिल्हा अध्यक्ष श्री कैलाश दादा पोटफोडे, नागपूर शहर अध्यक्ष श्री रमेश पाडन, सामाजिक कार्यकर्ते नितीन दादा तायवाडे, उपाध्यक्ष श्री शिवा तायवाडे, मातंग समाज एकीकरण समिती अध्यक्ष श्री बुध्दाजी सुरणकार, मुख्य सचिव प्रा.राहुलजी हिवराळे, गजेंद्र गायकवाड,रोशन नाकतोडे, संजय तेलंगे,मंथन लोखंडे,किरण वानखेडे,धिरज हिवराळे, श्रावण ठोसर व संपूर्ण मातंग समाज बांधव तहसील कार्यालय व एस डी ओ कार्यालय मध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते.

62
829 views