logo

अकोला लोकसभा निवडणुकीचा प्रचार यावर्षी थंडपणे दिसला आहे कारण उमेदवाराचे कारभारी झाल्यामुळे बारा .... .....

निवडणुकीचा प्रचार यंदा थंडपणे

रिसोड ता. २४ : लोकसभा २०२४ च्या निवडणूकीत महाआघाडी, महायुती या राजकीय समीकरणामुळे त्यात सामील असलेल्या अनेक घटक पक्षांच्या डझनावारी कारभाऱ्यांमुळे प्रचाराच पुरता गोंधळ उडाल्याची व प्रचार थंडावल्याची खमंग चर्चा सर्वत्र ऐकू येत आहे.

लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यातील अकोला लोकसभा मतदारसंघात आज प्रचाराचा शेवटचा होता. गेल्या आठ-दहा दिवसांपासून प्रचार अगदी थंडबस्त्यात सुरू होता. शहरी भागात क्वचित पदयात्रा, मतदारांशी वैयक्तिक संपर्क आणि चौक सभा पाहावयास मिळाल्या असल्यातरी

ग्रामीण भागात मात्र प्रचार नसण्यातच जमा होता. छोट्या छोट्या वाडीवस्त्यात आणि दुर्गम भागात केवळ प्रशासनाकडून राबविण्यात आलेली मतदान जनजागृती मोहिमेमुळेच लोकसभा निवडणूक असल्याचे सर्वसामान्य लोकांना माहिती पडले असल्याचे लोक बोलत आहेत. यावरून प्रचाराची गती किती धिमी होती हे सहज लक्षात येते.

अन्यथा प्रचार म्हटलं की गाव खेड्यातील जनता झोपेतून उठण्याआधीच मोठमोठे भोंगे लावलेल्या प्रचारगाड्या गावात शिरायाच्या त्यामुळे संबंधित उमेदवार कोण आहे आणि त्यांचे बोधचिन्ह काय आहे हे अखेरच्या घटकापर्यंत पोहचायचे. सर्वत्र जेवणावळी, ओल्यापार्त्या सर्रास

सुरू राहायच्या त्यामुळे आपसूकच निवडणुकीचे वातावरण तयार व्हायचे. यावर्षी मात्र कुठलाच निवडणुकीचा माहोल तयार झाला नसल्याचे मतदार बोलत आहेत.

याची कारणमीमांसा जाणुन घेण्याचा प्रयत्न केला असता, अनेक पक्षांची युती, आघाडी आणि त्या प्रत्येक घटक पक्षातील किमान एक कारभारी निवडावाच लागल्याने आपसूकच कारभाऱ्यांची संख्या वाढली. आणि अशा कारभाऱ्यांकडे जो निधी उपलब्ध झाला तो योग्य प्रमाणात खर्च न झाल्यामुळेच हा प्रचार पडला असल्याचे काही खंदे समर्थक बोलत आहेत. दुसरे कारण म्हणजे यावेळेस सोशल मीडिया हाच खरा प्रचारदूत ठरला आहे.

24
7080 views