logo

निमखेडी फाट्यावरून 2 पिस्तूल मॅगझिनसह 1 लाख 73 हजाराचा माल जप्त*

SHAIKH ASIF SHAIKH YUSUF BULDANA MAHARASHTRA AIMA NEWS


*निमखेडी फाट्यावरून 2 पिस्तूल मॅगझिनसह 1 लाख 73 हजाराचा माल जप्त*

◼️ _पती -पत्नी पोलिसांच्या ताब्यात_
◼️निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

बुलढाणा , २३ एप्रिल (AIMA न्यूज) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 23 एप्रिल रोजी पोलीस अधीक्षक बुलढाणा सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी देवराम गवळ तसेच पोलीस निरीक्षक अशोक लांडे सा .स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांचे मार्गदर्शनाखाली मलकापूर उपविभागातील गोपनीय माहिती वरून यांचे माहिती मिळाली की, एक इसम हा दुचाकी घेऊन जळगाव जामोद येथे येत असून तो स्वतः जवळ देशी पिस्टल व जिवंत काडतुसे बाळगून आहे , अशा मिळालेल्या माहितीनुसार 23 एप्रिल रोजी दुपारी 2.55 वाजता निमखेडी फाटा येथे धाड टाकली असता त्यांच्याकडे काही मुद्देमाल मिळून आला 2 देशी बनावटीचे पिस्तूल मॅगझीन सह किंमती प्रत्येकी 40 हजार रूपये असे एकूण 80 हजार रूपये, 23 जिवंत राऊंड किंमती 23 हजार रुपये, एक दुचाकी वाहन किमती 70 हजार असा एकूण 1 लाख 73 हजार रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. आरोपी अशोकसिंग नंदासिंग पटवा आणि त्याची पत्नी नारंगी कौर अशोकसिंग पटवा रा. पाचोरी तालुका खकणार जिल्हा बऱ्हाणपूर म.प्र. यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची ️कारवाई सपोनि आशिष चेचरे, दिपक लेकुरवाळे, एजाज खान, गणेश पाटील, युवराज राठोड, गजानन गोरले, आशा मोरे यांच्या पथकाने केली आहे.

18
1986 views