logo

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान रिसोड अंतर्गत मतदान जनजागृती कार्यक्रम आयोजन

*उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, रिसोड अंतर्गत एकाच दिवशी सर्व गावात जनजागृती कार्यक्रम चे आयोजन.*

महेंद्र महाजन

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान रिसोड अंतर्गत आज दिनांक 22/04/2024 रोजी एकाच दिवशी रिसोड तालुक्यात सर्व ग्रामपंचायत मध्ये उमेद महिला बचत गटातील महीलामार्फत सर्व गावातील मतदारांनी 100% मतदान करावे यासाठी. जिल्हाधिकारी. भुवनेश्वरी एस मॅडम ,मुख्य कार्यकारी अधिकारी श्री वैभव वाघमारे आणि किरण कोवे, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा वाशिम यांचे मार्गदर्शन आणि नियोजनाखाली जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष रिसोड अंतर्गत कार्यरत समुदाय संसाधन व्यक्ती, ग्रामसंघ, प्रभाग संघ पदाधिकारी यांनी गावा- गावात जनजागृती म्हणून घरो घरी भेटी , फेरी, रांगोळी, भिंतीवर घोषवाक्य च्या माध्यमातून मतदारांना मतदान करणे करीता प्रोत्साहित करण्यात आले. यावेळी प्रभाग स्तरावर उपस्थित प्रभाग समन्वयक यांनी चोख नियोजन करून सर्व गावात जनजागृती कार्यक्रम घेण्यात मोलाची भूमिका बजावली. यावेळी तालुका अभियान व्यवस्थापक श्री संतोष आघाव यांनी तालुक्यातील महिला बचत गटातील सर्व महिलांनी दिनांक 26/04/2024 रोजी आपला मतदानाचा हक्क बजावावा आणि इतर सर्व मतदारांनी घटनेने दिलेला मतदानाचा हक्क बजावून देश हितात आपला वाटा उचलावा असे आव्हान केले.
रिसोड तालुक्यात एकूण 2230 महिला स्वय सहाय्यता समूह कार्यरत असून जवळपास 22000 महिला स्वय सहाय्यता समुहासोबत जोडल्या गेल्या आहेत.
कार्यक्रमाच्या यशस्वीेते सर्व प्रभाग समन्वयक, तालुका व्यवस्थापक, आणि सर्व समुदाय संसाधन व्यक्ती, सर्व पदाधिकारी यांनी मोलाची भूमिका बजावली.

6
2922 views