
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर तिर्थक्षेत्र पोहरादेवीचा विकास प्रगतीपथावर
------ धर्मगुरू बापू सिंग महाराज
बंजारा समाजाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पोहरादेवी चा विकास स्वातंत्र्याच्या ७५ वर्षापर्यंत होऊ शकला नाही. परंतु प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तथा वाशिम, यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रयत्नातून तिर्थक्षेत्र पोहरादेवी चा विकास करण्यासाठी शेकडो कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.
बंजारा समाजाची काशी राजाश्रयापासून वर्षानूवर्ष वंचित होती.पोहरादेवी तिर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास होण्याचे द्रृष्ठीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली राजाश्रयाचे बहूमोल सहकार्य मिळाले.आज तिर्थक्षेत्र पोहरादेवी चा सर्वांगीण विकास होत आहे.समाजाचा विकास साध्य करण्यासाठी जनतेनी समाजाभिमुख कार्य करणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सहकार्य करावे.धर्मगुरू म्हणून मी माझ्या वतीने आई जगदंबा, संत सेवालाल महाराज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना परत देशसेवा करण्याची संधी देतील अशी आशा व्यक्त करीत धर्मगुरू प.पू.बाबूसिंग महाराज यांनी आपले आशीर्वाद देत तिर्थक्षेत्र पोहरादेवी च्या सर्वांगीण विकासासाठी राजाश्रयाचे भविष्यात ही सहकार्य मिळण्यासाठी समाजाने ही आपल्यास सहकार्य करणाऱ्यास मदत करणे अपरिहार्य आहे. असे ही धर्मगुरू प.पू बाबुसिंग महाराज यांनी मार्गदर्शन केले.
धर्मगुरू प.पू.बाबुसिंग महाराज मार्गदर्शन करताना यांच्या समवेत गोवर्धनजी राठोड , पंजाबरावजी पवार, सदाशिवजी चव्हाण,क्रृमदासजी महाराज, अश्वत्थामा चव्हाण,संजू महाराज यांचे सह हजारो भाविक भक्त तिर्थक्षेत्र पोहरादेवी येथे उपस्थित होते.