logo

स्कॉर्पिओ दगडवाडीजवळ पल्टी : चालकासह 4 जण ठार* देशमुख कुटुंबावर काळाचा घाला



स्कॉर्पिओ दगडवाडीजवळ पल्टी : चालकासह 4 जण ठार*
देशमुख कुटुंबावर काळाचा घाला
सादिक शाह
बुलढाणा, 17 एप्रिल (AIMA NEWS): नवरीला हळद लावण्यासाठी जालना येथे जाणाऱ्या अंबाशी येथील देशमुख कुटुंबीयांना मृत्यूने टिळा लावला. नवरदेवाकडची भर दास स्कार्पिओ देऊळगाव मही ते देऊळगाव राजा रस्त्यावर दगडवाडी जवळ पलटी झाली. आज सायंकाळच्या दरम्यान घडलेल्या अपघातात देशमुख कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. स्कार्पिओच्या चालकाला जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान त्यानेही दम तोडला.
प्राप्त माहितीनुसार अंबाशी तालुका चिखली येथील देशमुख कुटुंबात उद्या 18 एप्रिल रोजी लग्न होते.सदर लग्नाच्या अनुषंगाने नवरीला हळद लावण्यासाठी दोन वाहने जालना येथे जाण्यासाठी निघाली होती. यातील स्कार्पिओ जीप क्रमांक एम एच 28 बी क्यू 0606 यावरील चालकाचा ताबा सुटून सदर वाहन दगडवाडी फाट्या नजीक पलटी होऊन भीषण अपघात घडला.या अपघातात विलास जयवंतराव देशमुख वय 63,अशोक भीमराव नयाके रा.सवना वाशीम वय 65,वसंत देविदास देशमुख. वय 43 रा.अमानी वाशीम हे जागीच ठार झाले. तर वाहन चालक योगेश लक्ष्मण देशमुख यास छातीत जबर मार लागला व फुफुसात रक्तस्त्राव झाल्याने जालना येथे हलविण्यात आले.मात्र उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली. या भीषण अपघातात मीरा संजय देशमुख, शालिनी अनंता देशमुख, अक्षदा संदीप देशमुख, गोपाळ देशमुख, गजानन आसाराम तौर जखमी झाले. अपघात ग्रस्त वाहनात एकूण ११ जण होते तर मागील वाहनात नवरदेवा सह देशमुख कुटुंबातील व्यक्ती होते. मृतकात दोन जण पाहुणे असून ते मूळचे अंबाशी येथीलच रहिवासी होते.

141
5998 views