logo

रामटेकच्या गडावर कोण बाजी मारणार ? केदार की बावनकुळे

रामटेक :-
रामटेक लोकसभा क्षेत्रात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असुन सर्वच पक्ष आप आपल्या शक्तीने स्वतःला प्रचारात झोकुन दिले आहे. उमेदवारांची संख्या जरी बरीच असली तरी मुख्य लढत ही 3-4 उमेदवारात दिसत आहे. सध्याची परिस्थिती बघता शिवसेना शिंदे गट व महायुतीचे उमेदवार राजु पारवे , काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार श्यामकुमार बर्वे , काँग्रेसचे बंडखोर व वंचित बहुजन आघाडी समर्थित किशोर गजभिये व बसपा चे उमेदवार संदीप मेश्राम याच उमेदवारांना प्रचाराच्या मैदानात लोकांचा पाठिंबा बघायला मिळतो आहे. इतर उमेदवारांनी निवडणुकीत फाँर्म जरी भरला असला तरी प्रत्यक्ष प्रचारातुन ते गायब दिसत आहेत. वेळेत फाँर्म वापस न घेतल्याने वंचितच्या शंकर चहांदेची बटनही ईव्हीएम मध्ये सेट असणार यावेळी तेही किती मते खातात यावरही समीकरण अवलंबुन आहेत. नागपुर ग्रामीणचे रामटेक क्षेत्रातुन भाजपचे ज्येष्ठ नेते व प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे व काँग्रेसचे कद्दावर नेता सुनील केदार यांच्या प्रयत्नांवर ही निवडणुक अवलंबुन असल्याची धुसपुस जनतेत सुरु आहे. भाजपाला तेली समाज व काँग्रेसला कुणबी समाजाच भरघोस समर्थन या जागेवर मिळेल अस बोलल जात आहे. मागासवर्गीय व आदिवासींची मते 3 - 4 उमेदवारात डिव्हाईड होण्याची जनतेत चर्चा रंगली आहे. शेवटी जनतेत चर्चा एकच रंगत चालली आहे की केदार समर्थित उमेदवार श्यामकुमार बर्वे रामटेकचा गढ मारणार की बावनकुळे समर्थित उमेदवार राजु पारवे... की तिसरा उमेदवार बाजी मारुन घेऊन जाणार ... ख-या अर्थाने रामटेक लोकसभेची लढत दिवसें दिवस अधिक रंजक होत चालली आहे...!! बर्वे की पारवे .. की गजभिये...की मेश्राम... उमेदवारांसाठी विकासाची दारे खुली करणारी ही 5 वर्षी योजना कुणाच्या पारडयात जाईल हे सर्वस्वी ठरवण्याचा अधिकार जनतेलाच ...

315
18622 views