logo

न्यु गुजरखेडी(वाघोडा)येथे क्रांतीसुर्य राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले यांची १९७ वी जयंती आणि विश्वरत्न प.पुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या१३३व्या संयुक्त जयंती

दि.१५ एप्रिल २०२४ रोज सोमवारी सकाळी ९ ते सायंकाळी १० वाजता दरम्यान क्रांतीसुर्य राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले यांची १९७ वी जयंती आणि विश्वरत्न प.पुज्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या१३३व्या संयुक्त जयंती निमित्त भव्य बुद्ध भिमगिताच्या (कव्वालीच्या)दुय्यम मुकाबला व भोजन दान कार्यक्रम समता समिती शाखा न्यु गुजरखेडी(वाघोडा) ता.सावनेर जि.नागपुर द्वारे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाघाटन मा.सौ.मंजुषाताई गणेशजी चाचेरकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मा.श्री.अनिलजी मस्के आणि उपाध्यक्ष स्थानी मा.श्री.राजु घुगल (मा.नगर सेवक सावनेर)व कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणुन मा.अरूणजी के.पवार (संस्थापक के.डी.पवार कॉलेज सावनेर),मा.रामराव मोहाडे (मा.नगरसेवक सावनेर),मा.सौ.ज्योतीताई सिरसकर (जि.प.सदस्य वाकोडी सर्कल),मा.आशिष भाऊ माटे (मा.पं.स सदस्य) तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.पवन जैस्वाल (मा.नगर अध्यक्ष सावनेर), मा.गोवर्धनदास मुरडा,मा.युवराज बागडे,संजय गुप्ता व सावनेर शहरातील अनेक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.
कार्यक्रमाचे आयोजन रामदासजी नागदवने,बाबुलालजी सोनपिंपळे,आनंद कुभारे,धर्मेंद्र सोमकुवर,भिमराव बागडे, राजुजी मेश्राम,अशोक बागडे,दिलीप वाठोडे यांनी केले.

122
6231 views