
कुंभार झरी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती उत्साहात साजरी.
कुंभार झरी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती उत्साहात साजरी.
AIMA NEWS रियाज शहा/जाफराबाद जिल्हा जालना प्रतिनिधी
जाफराबाद – जाफराबाद तालुक्यातील कुंभार झरी गावात मोठ्या उत्साहात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती साजरी केली गेली . त्यात सर्व प्रथम ग्रामपंचायत कार्यालयात शासकीय जयंती साजरी केली. जिल्हा परिषद सदस्य कालेगाव शालीग्राम पाटिल म्हस्के यांनी डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमे समोर दीपप्रज्वलन केले. सरपंच विजय पाटिल परीहार उप सरपंच संतोष माळी माजी उपसरपंच अजय पैठणे सह ग्रामपंचायत सदस्य भगवान चव्हाण शरद चव्हाण, परमेश्वर केवट , सुनील चव्हाण व तंटा मुक्ती अध्यक्ष जगण चव्हाण माजी उपसरपंच मुबारक शाह नूर शाह व समस्त गावकरी मंडळी नी महामानवाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
त्या वेळेस उपस्थित , ग्रामस्थ ,भीमसैनिक सामाजिक कार्यकर्ते उपस्थितीत संदीप पैठ्णे यांनी रियाज शहा पत्रकार यांचे सत्कार केलें महामानवांनी भारतीयांसाठी केलेल्या कार्यावर प्रकाशझोत टाकून बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयेंतीच्या कार्यक्रमाची सांगता झाली. अश्या प्रकारे बाबा साहेबांची जयेंती जल्लोषात साजरी करण्यात आली.