logo

धोत्रा भंनगोजी गावात जातीय सलोखा जोपासून मुस्लिम बांधवांनी साजरी केली रमजान ईद!

मन्सूर शहा आयमा न्यूज धोत्रा भंनगोजी:---आज दिनांक ११ एप्रिल २०२४ रोजी धोत्रा भंगोजी गावात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असून. रमजान ईद निमित्त या गावात जातीय सलोखा चे दर्शन घडले असून. मुस्लिम बांधव रमजान ईद नमाज अदा करून मज्जिद च्या बाहेर निघतात सर्व हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा च्या वर्षाव केले अ असून. मोठ्या प्रमाणात हिंदू मुस्लिम बांधवात एकता दिसून आली. त्याचं कारणही तसं असून धोत्रा. भनगोजी, हे छोटेसे गाव असून या गावात मुस्लिम -हिंदू एका भावा- भावाप्रमाणे राहत असून नेहमी एकमेकांच्या समोर एकतेचे दर्शन घडवीत असतात. शिवजयंती, भीम जयंती रोहिदास महाराज जयंती ,की,कोणतेही महापुरुषांची जयंती असो की सार्वजनिक सन -उत्सव तसेच रमजान ईद असो की बकरी ,ईद, असो, किंवा, इतर आणखी कोणतेही धार्मिक मुस्लिम बांधाचे सन उत्सव असो मुस्लिम बांधव नेहमी अग्रेसर असतात.
या ईद मिलन कार्यक्रम प्रसंगी, सरपंच गुलाबसिंग सोनारे, उपसरपंच संदीप सर, उनाले, माजी सरपंच बळीराम काळे. (आमदार), विशंभर हलदे, देशोन्नती पत्रकार शामभाऊ देशमुख, कडूबा शावकार, (दैनिक खोज मास्टर न्यूज चे पत्रकार) मंनसूरशहा ,तंटामुक्ती अध्यक्ष पांडुरंग कापसे, अशोक शिंदे, अशोक काळे, मालोजीराव गुजर, वाल्मीक भाऊ कोईगडे, अमोल निकम, विवेक पवल, अमडापूर पोलीस स्टेशनचे जमदार ठाकूर साहेब, व त्यांचे सहकारी इंगळे, तसेच गणीभाई बागवान, मन्सूर शहा, सिकंदर शहा, मिस्किन शहा, सलमान शहा, साहिल शहा, शाहरुख शहा, ईसूब भाई बागवान, अमीर हमजा, जावेद भाई ह मिद भाई, मन्मद साहेब, शेख रहीम, जिलानी शहा, सरदार शहा, नादर शहा, शेरू भाई, हसन शहा. शेख जाबीर, शेख साबीर, शेख इकबाल, शेख.सोहील, असे समस्त मुस्लिम बांधव व हिंदू बांधव उपस्थित होते.

0
2198 views