logo

कुंभार झरी ता जाफराबाद येथे ईद-उल-फित्र ईद मोठया उत्साहात साजरी

कुंभार झरी ता जाफराबाद येथे ईद-उल-फित्र ईद मोठया उत्साहात साजरी. - मुस्लिम बांधवांनी एकमेकांशी गळाभेट घेऊन दिल्या शुभेच्छा




रियाज शहा / प्रतिनिधि जाफराबाद, जालना


जाफराबाद.दि 11 एप्रिल 2024 गुरुवार रोजी कुंभार झरी येथिल जामा मस्जिद येथे मुस्लिम बांधवातर्फे मोठया प्रमाणात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली..जगभरातील मुस्लिम लोक ईद-उल-फित्र साजरा करतात, जो सर्वात महत्वाचा सण आहे.मात्र राज्यासह देशात  मुस्लिम बांधवांच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्या डोळ्यात ईदचा उत्साह पाहायला मिळाला. यावेळी मुस्लिम बांधवांना एकमेकांना भेटून ईदच्या शुभेच्छा देत गळाभेट घेतली.हा सण रमजानच्या शेवटी साजरा केला जातो. यामध्ये गरिबांना अन्न देणे आणि भिक्षा वाटणे. ईद-उल-फित्र साजरी करून, उपवास आणि प्रार्थना कालावधी संपतो. चंद्र पाहिल्यानंतर लोक नवीन कपडे घालतात आणि आपल्या प्रियजनांना भेटतात.गेल्या महीनाभर मुस्लिम बांधवांनी सतत कडक उन्हात उपवास ठेवले.तरावी ची नमाज पठण केली सर्व हिन्दू मुस्लिम बांधवासाठी एकता अखंडता प्रेम संपूर्ण देशात सुखशांतीसाठी अल्लाहकड़े प्रार्थना केली.यामध्ये कुंभार झरी येथिल सर्व समाजबांधवांनी सहभाग घेऊन खऱ्या अर्थाने माणूसकीचा परिचय देऊन सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

37
2582 views