
▫️ भाजपचा पराभव करण्यासाठी इंडिया आघाडीचा प्रतिभाताई ला निवडून आणा - माकप चे आवाहन
▫️ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कायर व परसोडा येथे प्रचार मोहीम
वणी : "देश वाचवा, संविधान वाचवा व लोकशाही वाचवा" ही मोहीम मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष गांभीर्याने घेत असून संपूर्ण देशभर जनतेमध्ये जाऊन आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी प्रचार अभियान राबवित आहेत. त्या अनुषंगाने चंद्रपूर - वणी - आर्णी ह्या लोकसभा मतदार संघात पक्षाचे कार्यकर्ते तन, मन, धनाने स्वखर्चाने प्रचारात सामील झाले आहेत. वणी तालुक्यातील अनेक गावात सायकलने, मोटार सायकल ने प्रसंगी पायदळ गावखेड्यात जाऊन मेहनत घेत आहेत. काल माकपचे जिल्हा सचिव कॉ. कुमार मोहरमपुरी, किसान सभेचे राज्य कार्यकारिणी सदस्य कॉ. ॲड. दिलीप परचाके व किसान सभेचे नेते कॉ. मनोज काळे यांनी कायर व परसोडा येथे जाऊन कार्यकर्त्यांची बैठक घेतली.
देशात भाजपचा मोदी सरकारने देशातील सर्वच सरकारी संस्थांचे असांविधनिक पद्धतीने वापर करून अघोषित आणीबाणी लादली. विरोधकांचे मनोबल तोडून विरोधक विरहित हुकूमशाही पद्धतीने देश चालवीत आले आहेत. हा प्रकार सर्रास लोकशाही नसल्याचा नमुना आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला, युवक व विद्यार्थ्यांचे अधिकार संपवून त्यांना गुलामीत टाकण्याची प्रथा निर्माण केली आहे. बुद्धिभेद करून तर्क शक्ती नष्ट करून अंधभक्तांची फौज तयार करून जातीय, धार्मिक तेढ वाढविण्याचा प्रयत्न चालविला आहे. येणाऱ्या काळात सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता व संघीय रचना देणारे भारतीय संविधान बदलविण्यासाठी चारशे पार ची घोषणा केली आहे. हे सर्व भाजपचे जनविरोधी, देशविरोधी, लोकशाही व संविधान विरोधी कावा समजून घेऊन जनतेने भाजपचा डाव उधळून लावावा व आगामी निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी इंडिया आघाडीचा उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून आणावे असे आवाहन माकप आपल्या बैठका व प्रचार मोहिमेतून करीत आहेत. जनतेने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावे अशी विनंती कुमार मोहरमपुरी, ॲड. दिलीप परचाके, मनोज काळे, चंद्रशेखर सिडाम, कवडु चांदेकर, गजानन ताकसांडे, शंकर गाऊत्रे, सुधाकर सोनटक्के, रामभाऊ जीद्देवार, किसन मोहूरले, संजय वालकोंडे, संजय कोडापे, वसंता नागोसे, अमोल चटप आदींनी केले आहे.