logo

विजापूर नाका पोलीस स्टेशन DB पथकाची कारवाई,वाहन चोरीचे दोन गुन्हे केले उघड..

सोलापूर (प्रतिनिधी) :- गुन्ह्याची हकीकत अशी की,

दिनांक 21/3/2024 रोजी सिद्धेश्वर वनविहाराच्या गेट समोर सोलापूर व दि 18/03/2024 रोजी आदित्य नगर विजापूर रोड सोलापूर येथील एका घरा समोर पार्क केलेली दोन गाड्या अज्ञात चोरट्याने चोरून नेली म्हणून फिर्यादी यांनी विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे वरील प्रमाणे वाहन चोरी चे दोन तक्रारी नोंद होती.

नमुद गुन्हयात गुप्त बातमीदाराकडून अशी माहिती मिळाली की, विजापूर नाका पोलीस स्टेशन येथील चोरी गेलेले हिरव्या रंगाची मेस्ट्रो गाडी नेहरूनगर येथे येणार असल्याच्या माहितीवरून सापळा रचून तीन विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेतले. तपासा दरम्यान विजापूर नाका पोलीस स्टेशन गु. र. क्र 137/2024 कलम 379 भा. द. वी 379 हिरव्या रंगाची मेस्ट्रो गाडी MH 13 BL 8770 व गु.र. क्र 138/2024 कलम 379 भादवी मधील हिरो होंडा प्लेझर क्रमांक MH 13 BL 2057 या दोन मोटार सायकली तीन विधी संघर्ष बालकाकडे मिळून आली. सदर तिनी विधी संघर्ष बालकांच्या पालकांना नोटीस देऊन त्यांना सोडण्यात आले.

सदरची कारवाई दादा गायकवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजापूर नाका पोलीस स्टेशन, सपोनि शितलकुमार गायकवाड, पोहेकों/ सचिन हार, पोना/गणेश शिर्के, हुसेन शेख, पोकों/संतोष माने, श्रीनिवास बोल्ली, सोनार, अमृत सुरवसे, सद्दाम आबादीराजे, राहुल सुरवसे, स्वप्निल जाधव यांनी पार पाडली.

0
458 views