logo

भडगाव तालुक्यात उर्दू माध्यमाच्या नवनियुक्त 5 शिक्षण सेवकांचे पुष्प गुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आले.

आज दिनांक 30 मार्च 2024 रोजी जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळा नंबर 1 भडगांव येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हाजी जाकीर खान कुरेशी यांच्या तर्फे भडगाव तालुक्यात उर्दू माध्यमाच्या नवनियुक्त 5 शिक्षण सेवकांचे पुष्प गुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आले. यात जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळा भडगाव येथील 2 शिक्षण सेविका आणि जिल्हा परिषद उर्दू शाळा यशवंतनगर भडगाव येथील 2 शिक्षण सेवक आणि जिल्हा परिषद उर्दू शाळा गिरड तालुका भडगाव येथील 1 शिक्षण सेवकांचे सत्कार करण्यात आले. तसेच पवित्र रमजान महिना असल्याने कार्यक्रमात उपस्थित सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती चे सदस्यांना हाजी जाकीर खान कुरेशी साहब यांच्या तर्फे खजुर चे एक एक पॅकेट गिफ्ट देण्यात आले. सदर कार्यक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थीनीं, उर्दू बाॅईज व कन्या शाळा नंबर 1 भडगाव चे सर्व शिक्षक, उर्दू केंद्राचे केंद्र प्रमुख खलील सर, उर्दू बाॅईज व उर्दू कन्या शाळा नंबर 1 चे मुख्याध्यापक, उर्दू शाळा ग्रीन पार्क चे मुख्याध्यापक इम्तियाज खान सर,शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्देश उर्दू कन्या शाळा नंबर 1 भडगाव चे मुख्याध्यापक शेख नईम सर यांनी सांगितले तसेच सुत्र संचालन व आभार अशफाक अहमद सर यांनी केले. सदर कार्यक्रमात केंद्र प्रमुख मोहतरम खलील सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच कार्यक्रमाचे आयोजक व अध्यक्ष हाजी जाकीर कुरेशी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. तसेच जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळा नंबर 1 भडगांव येथे आनंदाई शनिवार या उपक्रमा अंतर्गत इयत्ता पहली ते चौथी च्या मुलींसाठी संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यात विद्यार्थीनींनी अति उत्साहाने सहभाग घेतला होता .आपापल्या वर्गातील पहिल्या आलेल्या तिन्ही विद्यार्थिनी मधिल अंतिम सामन्याचे निकाल
इयत्ता दुसरी ची विद्यार्थिनी
इस्मा शेख नईम बागवान हि प्रथम क्रमांक व इयत्ता पहिली ची विद्यार्थिनी अरीबा नाज़ अमजद खान हिने द्वितीय क्रमांक पटकावला आणि
इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी मुनीरा शेख रहीम तृतीय क्रमांकावर राहिली.

0
0 views