logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

बुलढाणा लोकसभेच्या रिंगणात एमआयएम ची एन्ट्री ? उमेदवाराची घोषणा लवकरच !

बुलडाणा लोकसभेच्या मैदानात आता ऑल इंडिया मजलीस- ए- इत्तेहाद- उल - मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाने उडी घेतली आहे. यासंदर्भात पक्षाची आढावा बैठक झाली असून लवकरच उमेदवार स्पष्ट होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष डॉ. मोबीन खान यांनी दिली. २७ मार्चला आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आम्ही यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांना अहवाल पाठविला आहे. त्यामध्ये तिघांच्या नावाचा उल्लेख आहे, त्यापैकी एक दलीत समाजाचे उच्च शिक्षित व्यक्ती आहे. त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. शिवाय जिल्ह्याचे अध्यक्ष घाटावरील डॉ. मोबीन खान, घाटाखालील दानिश शेख यांच्या सुद्धा नावान प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. वरिष्ठांचा निर्णय आल्यावर आम्ही लवकरच उमेदवार घोषित करू असेही त्यांनी सांगितले. यावेळी एम.आय.एम पक्षातील जिल्हाभरातील पदाधिकारी


प्रतिनिधी - साहिल खान,
(बुलढाणा जिल्हा)
9130079313

145
12567 views

Comment