logo

हातकणंगलेत दोरीने गळा आवळुन महिलेचा खुन

हातकणंगले / प्रतिनिधी
येथील इंडस्ट्रीअल इस्टेटकडे जाणाऱ्या मार्गावर तीन दिवसापुर्वी भाड्याने रहाण्यास आलेल्या रूपाली दादासो गावडे (रा. हिंगणगाव ता. हातकणंगले) हिचा आज सकाळी दोरीने गळा आवळुन खुन केल्याची घटना घडली. हि घटना हातकणंगले येथील राजदीप खोत यांच्या मालकीच्या खोलीत घडली असुन तिच्या सोबत तिचा हिंगणगाव येथील प्रियकर रहात असल्याचे पोलीसांकडुन सांगण्यात येत आहे . मात्र तो आज सकाळपासुन गायब झाला आहे . गळ्याभोवती दोरीचे व्रण आढळुन आले असुन हातकणंगले पोलीस ठाणेचे पो.हे.कॉ. महादेव खेडकर घटनास्थळी पंचनामा करीत आहेत . रूपालीच्या मोबाईलवरून संशयित व्यक्तीचा शोध घेण्याचे काम सुरु असुन श्वानपथक घटनास्थळी पाचारण करण्यात येणार आहे .

164
4619 views