logo

जातपात, धर्मांधता नष्ट करून शोषण विरहित समाजव्यवस्थे साठी भगतसिंगांचे विचार व कृती आजही प्रासंगिक - राजूर येथील मान्यवरांचा सूर ▫️ राजूर येथे शहीद दिना निमित्त शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना अभिवादन

राजूर कॉलरी : इंग्रजांनी स्वातंत्र्य चळवळीला कमजोर करण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणावर धार्मिक विभागणी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये इंग्रज यशस्वी झाले, त्याबरोबर देशात परंपरेने आलेला जाती वाद होता. त्याकाळात भगतसिंगांनी वृत्तपत्रात अनेक लेख लिहिले तसेच अनेकदा रस्त्यावर उतरून एकात्मता निर्माण करण्यासाठी जागृती केली. आज स्वातंत्र्याचा ७५ वर्षानंतर पुन्हा एकदा जातीवादाने व धर्मांधतेने डोके वर काढले आहे, अश्या वेळेस शहीद भगतसिंगांचे विचार व कृती आजही प्रासंगिक असून तरुणांनी त्यापासून प्रेरणा घ्यावी असे आवाहन करणारे सूर राजूर येथे झालेल्या शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांचा २३ मार्च शहीद दिना निमित्त झालेल्या अभिवादन कार्यक्रमात वक्त्यांनी काढला.

राजूर येथे असलेल्या शहीद भगतसिंग चौकात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेला शिक्षिका छाया काटकर व शंकर हीकरे यांचे हस्ते मेणबत्ती प्रज्वलित करून व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या अभिवादन कार्यक्रमात कॉ. कुमार मोहरमपुरी, शिक्षिका छाया काटकर, मुख्याध्यापक महेश लिपटे व कवी गायक राजेंद्र पुडके यांनी आपले विचार मांडले तसेच पुडके यांनी सुमधुर आवाजात गीते सुद्धा सादर केली.

यावेळेस बंडू ठमके, संजय कवाडे, संजय काटकर, साजिद खान, गौतम कवाडे, वर्मा काका, ओम पवार, ऍड.अरविंद सिडाम, दिशा पाटील, अमर फुलझेले, वर्षा सिडाम, अशफाक अली, राजेश मानवटकर, शांताराम फुलझेले, संतोष गेडाम, अमित करमरकर, जाबिर अली, शेख साबीर, संजय पाटील, कवडू करमरकर, सिनु कलवलवार, सागर नगराळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

9
15 views