
देशव्यापी " संविधान बचाव, लोकशाही बचाव, देश बचाव " ह्या आंदोलन अंतर्गत माकपचे एसडीओ मार्फत राष्ट्रपतींना निवेदन
▫️ देश विरोधी निर्णय घेणाऱ्या भाजपला निवडणुकीत हरविण्याचे जनतेला आवाहन
वणी : आर एस एस ची राजकीय संघटना असलेली भाजपचा मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात देशविघातक जन विरोधी कायदे, धोरणे व निर्णय घेत देशाला रसातळाला नेऊन ठेवले असून देशावर गेल्या ७० वर्षाचा अपेक्षा तीन पट कर्ज वाढवून देशातील नागरिकांवर प्रचंड कर्जाचे डोंगर उभे करून ठेवले आहे. एवढे कमी म्हणून की काय पेट्रोलियम पदार्थांवर प्रचंड कर लावून तीन पट डिझेल पेट्रोल व गॅस चे दर वाढवून देशात प्रचंड महागाई वाढवून जनतेचे कंबरडे मोडले आहे. दुसरीकडे शेतकरी विरोधी काळे कायदे करणे, संविधान विरोधी निवडणूक रोखे द्वारे भांडवलदारांकडून प्रचंड निधी उकळणे, ४४ कामगार कायदे रद्द करून भांडवलदार धार्जिणे ४ श्रम संहिता आणून श्रमिकांचे शोषण करण्यासाठी मोकळीक देणे, नवीन शैक्षणिक धोरण आणून सार्वजनिक शिक्षण व्यवस्था संपविणे, सी ए ए कायदा लागू करून धार्मिक मतभेद निर्माण करून विशिष्ठ धर्माला टार्गेट करून त्यांच्यावर अन्याय करणे, दरवर्षी २ कोटी लोकांना रोजगार देऊ म्हणून निवडणूक जिंकून गेल्या ४० वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारी वाढली, शासकीय रिक्त जागा न भरणे, सार्वजनिक उद्योग विकणे, शासकीय जागांचे खाजगीकरण करणे, ई डी, सी बी आय, निवडणूक आयोग, ह्यांचा गैर वापर करून विरोधी पक्षातील लोकांना तसेच सामाजिक कार्यकर्त्यांना टार्गेट करून त्यांना तुरुंगात टाकने, आदी संविधान विरोधी निर्णय घेऊन भाजपने जनविरोधी कार्य केल्याने ह्या सरकारला सत्तेवरून पायउतार करून येत्या निवडणुकीत " संविधान बचाव, लोकशाही बचाव, देश बचाव " ह्या देशव्यापी आंदोलन अंतर्गत देशात समाजवादी समाजव्यवस्था आणण्यासाठी व देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू ह्यांना इंग्रजांनी २३ मार्च दिनी फासावर लटकविण्यात आले, त्याचा दिनाचे निमित्ताने त्यांचा क्रांतिकारी विचारांना जिवंत करीत आज दिनांक २३ मार्चला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेचा वतीने वणीत निदर्शने आंदोलन ठेवण्यात आले होते. परंतु आचारसंहिता लागल्याने पोलीस विभागाकडून आंदोलनाची परवानगी नाकारल्याने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर पक्षाने बैठक घेऊन येणाऱ्या निवणुकित भाजपला हरविण्या साठी कंबर कसून जनतेत जागृती करण्याचे निर्णय घेण्यात आले.
यावेळेस कुमार मोहरमपुरी, ऍड. दिलीप परचाके, मनोज काळे, नंदू बोबडे, सुधाकर सोनटक्के, कवडु चांदेकर, गजानन ताकसांडे, संजय वालकोंडे, संदीप मोहारे, शंकर गाऊत्रे, वाघु सिडाम, संजय कवाडे, प्रीति करमरकर, किरण बोंसूले, वंदना ठाकरे, दिनकर सरोदे, लालू दडांजे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.