logo

सोलापुरात आमदार प्रणिती शिंदेंच्या वाहनावर हल्ल्याचा प्रयत्न

काँग्रेसकडून सोलापूर लोकसभेसाठी आमदार प्रणिती शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसापासून आमदार शिंदे लोकसभेसाठी गावभेट दौरा करत आहेत.
काल दिवसभर पंढरपूर तालुक्यात दौरा सुरू होता, सायंकाळी सरकोली गावाजवळ आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाहनावर हल्ला झाल्याचा आरोप केला आहे.

याबाबत सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाहनाची तोडफोड करण्याचा जमाव प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. यावेळी आमदार शिंदे संतापल्याचे दिसत आहे. त्या कारमधून खाली येऊन 'माझ्या गाडीला हात लावायचा नाही', असं बोलत असल्याचे दिसत आहेत.सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी गेल्या काही दिवसापासून आंदोलन सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंदोलक नेत्यांना गावात येऊ देत नाही, नेत्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू आहेत. दरम्यान, काल आमदार प्रणिती शिंदे चळे गावात गेल्या होत्या, यावेळी त्या गावातील ग्रामस्थांशी चर्चा करत होत्या. यावेळी मराठा आरक्षणाच्या घोषणा सुरू झाल्या. यानंतर काही वेळ गोंधळ झाला, यावेळी दोन्हीकडून बाचाबाची झाल्याचे दिसत आहे.

15
4089 views