logo

संजय राऊतांचं वादग्रस्त वक्तव्य, जीभ घसरली..

' मोदी नाही, औरंगजेब म्हणा '; संजय राऊतांकडून पंतप्रधान मोदींची तुलना औरंगजेबशी ...मोदींनी दिले संजय राऊतांना प्रत्युत्तर

बुलढाणा - गुजरातमध्ये जेथे मोदी जन्माला आले, त्याच्या बाजूला दाहोद नावाचे गाव आहे. तेथे औरंगजेब जन्माला आला. म्हणून ही औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून या महाराष्ट्रावर चाल करून येत आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेद्र मोदी यांना औरंगजेब म्हणा, असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी केले आहे.

ते बुलढाणा येथे शिवसेनेच्या मोळाव्यात बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, "महाराष्ट्र यासाठी मोठा आहे, कारण या मातीत छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, यामुळे या महाराष्ट्राला इतिहास आहे. आणि आज जे महाराष्ट्रावर चाल करून येत आहेत. ते गुजरातचे राज्यकर्ते मोदी असतील किंवा शाह असतील. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला. गुजरातमध्ये जेथे मोदी जन्माला आले, त्याच्या बाजूला दाहोद नावाचे गाव आहे. तेथे औरंगजेब जन्माला आला. म्हणून ही औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून महाराष्ट्रावर चाल करून येत आहे. शिवसेनेच्या विरोधात आणि आमच्या स्वाभिमानाच्या विरोधात."

यावेळी, समोरील कार्यकर्त्यांमधून एकेरी नावाने 'मोदी आला मोदी, अशी हाक आली. यावर, मोदी आला नाही, 'औरंगजेब आला म्हणा', असे राऊतांनी म्हटले आहे.

"हा इतिहास सांगण्याचे कारण म्हणजे, या राज्यात शिवाजी महाराज जन्मले आणि बाजूच्या राज्यात औरंगजेब जन्माला आला. पण जे-जे या महाराष्ट्र वर चाल करून आले, ज्यांनी ज्यांनी या महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर या राज्यातल्या हिंदवी स्वराज्यावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला, ते औरंगजेब असेल, शाहिस्ता खान असेल, अफजल खान असेल, त्या सर्वांना याच मातीत गाडण्याचं काम इतिहास झालेले आहे. त्यामुळे आताही त्या विचाराने या महाराष्ट्रावर हल्ले करणार असतील, तर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने स्थापन झालेली शिवसेना, त्या शिवसेनेचे निर्माते बाळासाहेब ठाकरे आहेत आणि ती शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुढे घेऊन चाललो आहोत," असेही संजय राऊत म्हणाले.

राऊत पुढे म्हणाले, "याद राखा, महाराष्ट्रावर चाल करून येण्याचा प्रयत्न करू नका. हा महाराष्ट्र संपवण्याचे कारस्थान सुरू आहे. शिवसेनेवर हल्ला केला, शिवसेनेचे दोन तुकडे केले, ते यासाठी केले, कारण त्यांना या महाराष्ट्रात स्वाभिमानी मराठी मानसाला संपवायचे आहे. हा महाराष्ट्र विकायचा आहे. मुंबई विकायची आहे आणि उद्योगपतींच्या घषात घालायची आहे. हे आपल्याला होऊ द्यायचे नाही." एवढेच नाही, तर जोवर शिवसेना आहे, तोपर्यंत शिवरायांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न शिवसेने पुढे घेऊन जाईल आणि ते हिंदवी स्वराज्याचे स्वप्न तोडण्यासाठी आधी शिवससेना तोडली पाहीजे, मग महाराष्ट्र तोडू मग मुंबई तोडू, अशा प्रकारचं कारस्थान या दिल्ली आणि गुजरातच्या लोकांनी केलंय. त्यांना तोंड देऊन संघर्ष करून त्यांना मागे हटवायचे आहे, असेही राऊत यांनी म्हटले आहे.

संजय राऊतांच्या या टीकेवर आता खुद्द पंतप्रधान मोदींनी टिप्पणी केली आहे. मोदींनी वेगळ्या पद्धतीनं राऊतांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. मोदींच्या टीकेवरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत. मोदी सरकार सध्या गेल्या दहा वर्षांचं रिपोर्ट कार्ड देशवासियांशी शेअर करत आहे. अशातच विरोधी पक्ष सातत्यानं पंतप्रधान मोदींवर टीका करत आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी पक्षनेत्यांच्या या टीकेला आणि टिप्पण्यांना नेहमीच वेगळ्या पद्धतीनं उत्तर देतात. बुधवारी (20 मार्च) पंतप्रधान मोदींनी एका खासगी टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

'मोदी नाही, औरंगजेब म्हणा'; संजय राऊतांकडून पंतप्रधान मोदींची तुलना औरंगजेबशी

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आज विरोधकांनी 104 व्यांदा मोदींना शिवीगाळ केली. औरंगजेब या नावानं माझा सन्मान केला. असं म्हणत मोदींनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत म्हणाले होते की, औरंगजेबचा जन्म पीएम मोदींच्या गावाजवळ झाला होता. त्यामुळे दोघांची विचारसरणी सारखीच आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर भाजप नेत्यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. अशातच आता खुद्द मोदींनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे.

आपण पुढच्या 25 वर्षांचा रोडमॅप बनतोय : पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी म्हणाले की, सरकार आपल्या दहा वर्षांच्या कामाचे रिपोर्ट कार्ड ठेवत आहे. आम्ही पुढील 25 वर्षांचा रोडमॅप बनवत आहोत आणि आमच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या 100 दिवसांचा आराखडाही तयार करत आहोत. दुसरीकडे आमचे विरोधक आहेत. ते नवनवीन विक्रमही करत आहे. आज त्यांनीच दहावी शिवी मोदींना दिली. औरंगजेब म्हणून मला सन्मानित केलं.

संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर टीका करताना भाजप नेते सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, औरंगजेबाचा गौरव करणाऱ्यांच्या पाठीशी उद्धव यांची शिवसेना उभी आहे. अशा सर्व वक्तव्यांना जनता योग्य प्रतिसाद देईल.

7
4753 views