logo

राज्य शासनाकडून ऑटो रिक्षा चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना; ५० कोटींचा निधी मंजूर रियाज सय्यद यांच्या गेल्या ७ वर्षांपासूनच्या पाठपुराव्याला यश

सोलापूर/प्रतिनिधीः राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत १७ मोठे निर्णय घेतले आहेत. त्यापैकी एक म्हणजे ऑटो रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळाला पन्नास कोटी अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांनी स्वागत केले आहे, मात्र राज्य शासनाने ऑटोरिक्षा, टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळाला फक्त ५० कोटी रु. निधी देऊन आखडता हात घेतल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

वाहतूक संघटना संयुक्त महासंघ गेल्या सात वर्षांपासून ऑटोरिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करत आहे. ऑटोरिक्षा चालकांचे जीवनमान उंचावण्यासाठी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने अनेक वेळा आंदोलने करून राज्य शासनाला कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास भाग पाडले.

सात वर्षांच्या अथक संघर्षानंतर राज्य शासनाने ऑटो रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन केले. या कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून रिक्षाचालकांना व त्यांच्या पाल्यांना विविध लाभ मिळावेत यासाठी ३०० कोटी रुपयांची

रियाज सय्यद यांनी ऑटो रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला. आणि त्या मागणीला यश आले. सोलापुरातील ऑटो रिक्षाचालकांनी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांचा सत्कार करून आनंद साजरा केला. सत्काराला उत्तर देताना रियाज सय्यद यांनी राज्य शासनाचे आभार व्यक्त करतानाच ऑटो रिक्षाचालक कल्याणकारी मंडळाला ३०० कोटी रुपयांच्या निधी मिळावा यावर आपण ठाम असल्याचे सांगितले.

तरतूद करावी अशी मागणी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाची होती. पण राज्य शासनाने केवळ ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती निर्माण केली असल्याची टीका रियाज सय्यद यांनी केली. या मागणीसह रिक्षाचालकांच्या अनेक मागण्या वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने गेल्या अनेक वर्षांपासून लावून धरल्या होत्या. परंतु एकही मागणी मान्य न झाल्याने वाहतूक संघटना

संयुक्त महासंघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागण्या मान्य न झाल्यास येत्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता. अशातच राज्य शासनाने ५० कोटी निधीची घोषणा करून एक प्रकारे रिक्षा चालकांना थोडा का होईना दिलासा मिळाला आहे. म्हणून हा वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचा विजय असल्याची चर्चा रिक्षा चालकांमध्ये आहे.

2
898 views